Home /News /lifestyle /

4 महिन्यांची प्रेग्नंट वाटत होती महिला; कुत्र्याने पोटावर उडी मारताच बाहेर पडला 'मृत्यू'

4 महिन्यांची प्रेग्नंट वाटत होती महिला; कुत्र्याने पोटावर उडी मारताच बाहेर पडला 'मृत्यू'

पोटातून जे बाहेर पडलं ते पाहून महिलेला धक्काच बसला.

    ब्रिटन, 01 सप्टेंबर : लठ्ठपणा आणि प्रेग्नन्सी (Pregnancy) ही पोट वाटण्यामागील दोन मुख्य कारणं. ब्रिटनमध्ये अशाच एका महिलेचं पोट (Big stomach) इतकं वाढलं होतं की ती प्रेग्नंटच वाटत होती. पण तिच्या कुत्र्याने तिच्या पोटावर उडी मारली आणि तिच्या पोटात असलेला मृत्यू तिच्यासमोर आला (Tumor in stomach). साऊथ टिनेसाइडमध्ये (South Shields, South Tyneside) राहणारी 41 वर्षांची टेस रॉबिनसन. तिचं पोट वाढत होतं. ती चार महिन्यांची प्रेग्नंट असल्यासारखीच वाटत होती. तिचा पाळीव कुत्रा लोला नेहमी तिच्या पोटाकडे पाहत राहायचा. हे वाचा - धक्कादायक! सेक्स पार्टनर समजून समुद्री साप करताहेत माणसांवर हल्ले एक दिवस तिच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. म्हणून ती आराम करण्यासाठी म्हणून अशीच झोपली. तेव्हा तिच्या कुत्र्याने तिच्या पोटावर उडी मारली. तेव्हा तिला पोटात गाठीसारखं काहीतरी दिसलं. टेस खूप घाबरली. तिने लगेच डॉक्टरांकडे धाव घेतली. तिच्या तपासण्या झाल्या. तेव्हा तिच्या पोटात ट्युमर असल्याचं निदान झालं, तिला धक्काच बसला. तिच्या पोटात 12 सेंटीमीटरचा ट्युमर होता. हा ट्युमर साधा नव्हे तर कॅन्सरचा ट्युमर होता. जानेवारी 2021 मध्ये तिला ओव्हेरिअन कॅन्सर असल्याचं समजलं. हे वाचा - Porn बघण्याची सवय लागली आहे का? मग 'हे' उपाय करून बघा; कायम राहाल दूर सुरुवातीच्या टप्प्यातच कॅन्सरचं निदान झाल्याने त्यावर उपचार करणं सोपं झालं. तिच्यावर सध्या ट्रिटमेंट सुरू आहे. ट्युमरच्या रूपाने ती आपल्या पोटात मृत्यूच वाढवत होती. पण हा मृत्यू तिच्या कुत्र्याला दिसला आणि त्याने वेळीच आपल्या मालकीणीचा जीव वाचवला.
    Published by:Priya Lad
    First published:

    पुढील बातम्या