• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • आणखी एका महासाथीचं संकट! कोरोनाव्हायरसनंतर West Naile Virus चं थैमान

आणखी एका महासाथीचं संकट! कोरोनाव्हायरसनंतर West Naile Virus चं थैमान

वेस्ट नाइल व्हायरस (West Naile Virus) विरोधात कोणतीही लस नाही.

  • Share this:
मॉस्को, 01 सप्टेंबर : कोरोना विषाणूची (Coronavirus) जागतिक साथ अद्याप आटोक्यात आलेली नाही. त्यातच आता आणखी एका नव्या विषाणूच्या संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. वेस्ट नाइल व्हायरसच्या (West Naile Virus - WNV) संसर्गात वाढ होण्याची भीती रशियाने (Russia) व्यक्त केली आहे. कारण कमी तापमान आणि प्रचंड पाऊस असं वातावरण या विषाणूच्या संसर्गासाठी कारणीभूत असलेल्या डासांच्या उत्पत्तीला अनुकूल असतं. वेस्ट नाइल व्हायरस मूळचा आफ्रिकेतला (Africa) आहे आणि आता तो आशिया, युरोप आणि अमेरिकेच्या उत्तर भागात पसरला आहे. हा व्हायरस प्रामुख्याने डास चावल्याने (Mosquito Bite) पसरतो. या विषाणूमुळे मज्जासंस्थेशी संबंधित विकार होऊ शकतात. वेस्ट नाइल फीव्हर अर्थात या विषाणूमुळे येणाऱ्या तापाचे रुग्ण रशियाच्या (Russia) नैर्ऋत्य भागात आढळले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, माणसात हा विषाणू पसरण्यास प्रतिबंध करण्यासाठी कोणतीही लस अजून उपलब्ध नाही. मात्र घोड्यांसाठी या विषाणूला प्रतिबंधक एक लस उपलब्ध आहे. या विषाणूसंदर्भातली काही माहिती जाणून घेऊ या. - वेस्ट नाइल व्हायरस म्हणजे नेमकं काय? - वेस्ट नाइल व्हायरस हा एक विषाणू असून, त्याचा फैलाव संसर्गग्रस्त डासांपासून होतो. क्यूलेक्स जातीचा डास हा विषाणू पसरवतो. हे डास चावल्याने या विषाणूचा संसर्ग आधी पक्ष्यांमध्ये होतो, तर नंतर तो माणसांमध्ये पसरू शकतो. हे वाचा - कोरोनावर मात केल्यानंतर ठणठणीत राहण्यासाठी फॉलो करा 'हा' डाएट माणसाला या विषाणूचा संसर्ग झाला, तर मज्जासंस्थेशी संबंधित विकार होऊ शकतो. या विषाणूचा संसर्ग झालेल्या 20 टक्के जणांना वेस्ट नाइल फीव्हर (West Naile Fever) होतो. हा विषाणू डेंग्यू, झिका आणि येलो फीव्हरच्या विषाणूंशी संबंधित आहे. - वेस्ट नाइल व्हायरसचा संसर्ग झाल्याची लक्षणं - या विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये सहसा लक्षणं दिसत नाहीत. दिसलीच, तर अगदी सौम्य असतात. त्या लक्षणांमध्ये डोकेदुखी, ताप, त्वचेवर लाल चट्टे, अंगदुखी आणि लिम्फ नोडला सूज येणं आदी लक्षणांचा समावेश आहे. ही लक्षणं काही दिवसांपासून काही आठवड्यांपर्यंत राहू शकतात. साधारणतः ही लक्षणं आपोआप कमी होतात. - या विषाणूचं उगमस्थान - जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, हा विषाणू पहिल्यांदा 1937 साली युगांडाच्या वेस्ट नाइल जिल्ह्यात एका महिलेत आढळला होता. 1953 साली कावळे आणि कबूतरांमध्येही हा विषाणू आढळला होता. हे वाचा - Delta नंतर आता C.1.2; लशीलाही चकवा देणारं कोरोनाचं आणखी एक भयंकर रूप - हा विषाणू केव्हा घातक ठरू शकतो? - वेस्ट नाइल व्हायरसने मेंदूत प्रवेश केला, तर तो प्राणघातक ठरू शकतो. मेंदूला सूज आणण्यास हा विषाणू कारणीभूत ठरू शकतो. त्याला एन्सेफेलायटिस असं म्हटलं जातं. यामुळे मेनिंजायटिसदेखील होऊ शकतो. - कोणाला या विषाणूच्या संसर्गाचा धोका जास्त असू शकतो? - लहान मुलं, वयोवृद्ध व्यक्ती आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना या विषाणूच्या संसर्गाचा धोका जास्त असतो. - उपाय काय? - आतापर्यंत माणसांमध्ये वेस्ट नाइल रोगासाठी कोणताही विशिष्ट उपचार किंवा लस उपलब्ध नाही. डास चावणार नाहीत, याची काळजी घेणं हाच सर्वांत महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे.
First published: