मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

बाइकवर करत होता खतरनाक स्टंट, हवेत उडाला तरुण आणि... अंगावर शहारा आणणारा VIDEO

बाइकवर करत होता खतरनाक स्टंट, हवेत उडाला तरुण आणि... अंगावर शहारा आणणारा VIDEO

सोशल मीडियावर(Scoial media) बाईक स्टंटचा (Bike stunt) हा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे.

सोशल मीडियावर(Scoial media) बाईक स्टंटचा (Bike stunt) हा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे.

सोशल मीडियावर(Scoial media) बाईक स्टंटचा (Bike stunt) हा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 26 मार्च : काहीतरी वेगळं करून सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी तरुण काही ना काही करत असतात. शिवाय फिल्ममधील स्टंटबाजी पाहून तसा स्टंट (Dangerous stunt) प्रत्यक्षात करण्याचा मोहसुद्धा अनेक तरुणांना आवरत नाही. आपल्या आवडत्या स्टारची स्टाईल तर कित्येकजण मारतातच. मग त्याच जीवघेणा स्टंट हा असेना. असाच बाईक स्टंट (Bike stunt) करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) होतो आहे. बाइकवर स्टंट करणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ पाहून अक्षरश: हृदयात धडकी भरते. आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी आपल्या सोशल मीडियावर बाईक स्टंटचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसे सोशल मीडियावर तुम्ही बरेच धक्कादायक व्हिडीओ पाहिले असतील. पण दिपांशू यांनी या व्हिडीओतून लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडीओत पाहू शकता, एक तरुण सुरुवातीला बाईकवरून येत असतो हळूच तो बाईकवर उभा राहतो आणि बाईकच्या हँडलवरून दोन्ही हात सोडून देतो. बाईक आपोआप चालत असते आणि याच वेगाने चालणाऱ्या बाईकवर तरुण उभं राहण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा तोल ढासळतो. बाईकवरून नियंत्रण सुटतं. हे वाचा - रोलर कोस्टर राइडची मजा लुटताना तोंडावर आपटला पक्षी; पुढे काय झालं पाहा VIDEO आपल्या डोळ्याची पापणी लवते न लवते तोच हा तरुण हवेत उडतो. त्याची बाईक एका दिशेला आणि तो एका दिशेला. हवेत उंचावर उडून तो धाडकन जमिनीवर आपटतो. त्याने डोक्यावर हेल्मेटसुद्धा घातलेलं नाही. त्यामुळे त्याच्या डोक्याला जोरात मार बसतो. शिवाय तो इतक्या जोरात आपटला आहे की त्याच्या शरीरातील हाडंही तुटलं असावं असंच दिसून येतं. दिपांशू यांनी हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे. तुम्ही तुमची मुलं किंवा मित्रांसोबत अशी दुर्घटना होताना पाहू शकता का? नाही ना? मग त्यांना असं मूर्खपणा करण्यापासून रोखा. सुरक्षेला प्राथमिकता द्या. त्यांना नियमांतं पालन करायला शिकवा. हे वाचा - Shocking video : 12 व्या मजल्यावरून कोसळला, स्वत:च उठून बसला 5 वर्षांचा चिमुरडा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतो आहे. त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. सर्वांनी या व्हिडीओकडे लक्ष वेधत असे स्टंट करून नका असं आवाहन केलं आहे.
First published:

Tags: Bike accident, Shocking viral video, Stunt video, Viral

पुढील बातम्या