मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /धक्कादायक! मानेवर बसलं Bats, 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; नेमकं काय घडलं पाहा

धक्कादायक! मानेवर बसलं Bats, 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; नेमकं काय घडलं पाहा

वटवाघळाशी संपर्कात आल्यानंतर व्यक्तीची एक चूक त्याच्या जीवावर बेतली.

वटवाघळाशी संपर्कात आल्यानंतर व्यक्तीची एक चूक त्याच्या जीवावर बेतली.

वटवाघळाशी संपर्कात आल्यानंतर व्यक्तीची एक चूक त्याच्या जीवावर बेतली.

    वॉशिंग्टन, 30 सप्टेंबर : कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) वटवाघूळ (Bats) सर्वाधिक चर्चेत आलं. सध्या थैमान घालत असलेला कोरोना याच वटवाघळांमधील असल्याचं सांगितलं जातं. वटवाघळांमध्ये असे बरेच कोरोनाव्हायरस (Coronavirus in bats) सापडले आहेत. कोरोनामुळे चर्चेत असलेल्या याच वटवाघळामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे (Man died from Rabies by bats). . पण याचं कारण कोरोनाव्हायरस नाही तर रेबीज आहे (Rabies by bats).

    कुत्रा (Dog) आणि विशेषतः पिसाळलेला कुत्रा चावला, तर माणसाला रेबीज (Rabies) होतो, हे सर्वांनाच माहीत आहे; पण अन्य जनावरांमधूनही (Animals) रेबीजच्या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो, याची अनेकांना कल्पना नाही. त्यापैकीच एक म्हणजे वटवाघूळ. असाच एक वटवाघूळ अमेरिकेती एका व्यक्तीच्या मानेवर बसला. त्यानंतर त्या व्यक्तीला रेबीजची लागण झाली आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

    अमेरिकेतल्या इलिनॉय राज्यात (Illinois) ही घटना घडली आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, 80 वर्षांपेक्षा अधिक वयाची ही व्यक्ती साधारण एक महिन्यापूर्वी वटवाघळांच्या संपर्कात आली होती. एके दिवशी सकाळी झोपेतून उठल्यावर आपल्या गळ्यावर एक वटवाघूळ बसल्याचं त्या व्यक्तीच्या लक्षात आलं; मात्र त्यानंतर ही व्यक्ती डॉक्टरकडे गेली नाही. काही दिवसांनी तिला घसा दुखणं, डोकं दुखणे, बोलताना त्रास होणं, आकडी येणं अशी लक्षणं दिसू लागल्यानंतर डॉक्टरना दाखवण्यात आलं; त्या वेळी त्यांनी रेबीज झाल्याचं निदान केलं.

    हे वाचा - अरे बापरे! लसीकरणानंतर तोंड झालं वाकडं; कोरोना लशीचा दुष्परिणाम झाल्याचा दावा

    रेबीजवरील लस (Vaccine) उपलब्ध असल्यानं रेबीजमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण अत्यंत कमी झालं आहे. मात्र लोकांची दुर्लक्ष करण्याची वृत्ती किती घातक ठरू शकते याचंच अमेरिकेलीत हे उदाहरण आहे. या व्यक्तीनेही रेबीज लस घेण्यास नकार दिला. त्यानंतर त्याचा आजार वाढत गेला आणि  मंगळवारी (28 सप्टेंबर) त्याचा मृत्यू झाला.  67 वर्षांत प्रथमच अमेरिकेत रेबीजनं मृत्यू होण्याची घटना घडली आहे.  सीडीसी या अमेरिकन आरोग्य संस्थेनंही (CDC) या प्रकरणाचा तपास केला आणि त्या व्यक्तीला रेबीजची लागण झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

    रेबीजचा विषाणू मानवी शरीरात 20 ते 60 दिवस जगू शकतो. रेबीजची लक्षणं उशिरा दिसतात. लक्षणं दिसल्यानंतर उपचारांसाठी जाईपर्यंत उशीर झालेला असतो. त्यामुळे कोणत्याही प्राण्यापासून जखम झाल्यास तत्काळ वैद्यकीय उपचार घेणं, रेबीज प्रतिबंधात्मक लस घेणं आवश्यक आहे. अन्यथा या व्यक्तीप्रमाणे जिवावर बेतू शकतं, असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) केलं आहे.

    हे वाचा - काळ आला होता वेळ नाही! एका घड्याळानेच वाचवला तरुणाचा जीव; Apple Smartwatch ने केली कमाल

    वटवाघळामार्फत (Bat) पसरलेल्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गाचे भयावह परिणाम सगळं जग सध्या अनुभवत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेबीजसारख्या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे.

    First published:

    Tags: America, Disease symptoms, Health, Lifestyle, Wild animal