• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • अरे बापरे! लसीकरणानंतर तरुणीचं तोंड झालं वाकडं; कोरोना लशीचा दुष्परिणाम झाल्याचा दावा

अरे बापरे! लसीकरणानंतर तरुणीचं तोंड झालं वाकडं; कोरोना लशीचा दुष्परिणाम झाल्याचा दावा

कोरोना लस घेतल्यानंतर तिसऱ्याच दिवशी तरुणीची अवस्था भयंकर झाली.

 • Share this:
  भोपाळ, 29 सप्टेंबर : जास्तीत जास्त कोरोना लसीकरणावर (Corona vaccination) भर दिला जातो आहे. कोरोना लशीचे काही दुष्परिणामही (Corona vaccine side effect) दिसून येत आहेत. कोरोना लस घेतल्यानंतर सामान्यपणे ताप येणं, डोकं जड होणं, अशक्तपणा असा समस्या जाणवत आहेत. पण एका तरुणीने मात्र कोरोना लशीमुळे आपलं तोंड वाकडं झाल्याचा दावा केला आहे (Face paralysis after corona vaccination). मध्य प्रदेशच्या (Madhya pradesh corona vaccination) जबलपूरमधील (Jabalpur) तरुणीने कोरोना लसीकरणानंतर आपला चेहरा वाकडा झाला असं म्हटलं आहे. त्यानंतर ती थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली आणि तिथे तक्रार केली. तरुणीने शनिवारी (25 सप्टेंबर) कोरोना लस घेतली. कोरोना लशीचा तिने पहिला डोस घेतला. तिने कोविशिल्ड लस घेतली होती. यानंतर दोन दिवस तिला वेदना होत होत्या आणि तिसऱ्या दिवशी तिचा चेहरा वाकडाच झाला. हे वाचा - कोरोना लसीकरणात महाराष्ट्रच अव्वल; देशात सर्वाधिक लसीकरण करूनही यूपी पिछाडीवर तरुणीने सांगितलं, दोन दिवस तिच्या खांद्यात आणि मानेत तीव्र वेदना होत होत्या.  तिसऱ्या दिवशी सोमवारी 27 सप्टेंबरला ती सकाळी उठली तेव्हा तिला आपला चेहरा वाकडा झाल्याचं दिसलं. तिने तात्काळ डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टारांनी तिला फेस पॅरालिसिस म्हणजे तिच्या चेहऱ्याला लकवा मारल्याचं सांगितलं. तिला काही औषधंही देण्यात आली. पण बरं होण्यास खूप वेळ लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं. हे वाचा - सलाम! कोरोनाला हरवण्यासाठी नर्सचं मोलाचं कार्य, 8 महिन्यांत एकही सुट्टी न घेता 61000 जणाचं केलं Vaccination टीव्ही 9 च्या रिपोर्टनुसार आपल्याला कोरोना लशीमुळे फेस पॅरालिसिस झाला असा दावा या तरुणीनेने केला आहे. ती तक्रार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. तिने प्रशासनाकडून उपचारासाठी मदत मागितली आहे.
  Published by:Priya Lad
  First published: