मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

लाखमोलाची ढेकर! एका Burp साठी त्याला मोजावे लागले तब्बल 1 लाख रुपये

लाखमोलाची ढेकर! एका Burp साठी त्याला मोजावे लागले तब्बल 1 लाख रुपये

...आणि 20 वर्षांनी त्याला ढेकर आली.

...आणि 20 वर्षांनी त्याला ढेकर आली.

...आणि 20 वर्षांनी त्याला ढेकर आली.

लंडन, 05 ऑक्टोबर : कोणत्याही व्यक्तीला ढेकर (Burp) येणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे. आपलं शरीर आत जाणारी जास्तीची हवा ढेकराच्या माध्यमातून बाहेर सोडते. अनेकदा गॅस पोटापर्यंत न पोहोचता अन्ननलिकेत साठून राहतो, तेव्हा ढेकराच्या माध्यमातून तो बाहेर टाकला जातो. सर्वसामान्यपणे प्रत्येक माणसाला ढेकर येतो. परंतु, अशा एका माणसाविषयी शास्त्रज्ञांना माहिती मिळाली आहे की ज्याने गेल्या 20 वर्षांत एकदाही ढेकर दिलेली नाही.

इंग्लंडमधल्या (England) ग्रिम्स्बी (Grimsby) येथे राहणाऱ्या 35 वर्षांच्या फिल ब्राउनला (Phil Brown) एक विचित्र आजार जडला होता. गेल्या 20 वर्षांत त्यांना एकदाही ढेकर आली नव्हती. यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला.

बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, की, जेव्हा मी तरुण होतो तेव्हा मला ढेकर येत; मात्र अचानक ढेकर येणं बंद झालं. मागील 20 वर्षांत मला एकदाही ढेकर आलेला नाही.

हे वाचा - थंड पाण्यानं अंघोळ करता? मग जाणून घ्या फायदे आणि तोटे दोन्ही

मित्रांसोबत फिल जेव्हा ड्रिंक्स किंवा जेवण्यासाठी बाहेर जात असत, तेव्हा ढेकर न आल्यानं त्यांचं पोट फुगत असे. यामुळे त्यांना खूप विचित्र वाटे. याबाबत त्यांनी अनेक डॉक्टर्सचा सल्ला घेतला. मात्र काहीही उपयोग झाला नाही. डॉक्टर त्यांना अॅसिडिटी किंवा इन्डायझेशनवरचं औषध देत असत. एके दिवशी अचानक ढेकर येत नसलेल्यांसाठी औषधाविषयीची पोस्ट त्यांना सोशल मीडियावर (Social Media) दिसली. तेव्हा ही समस्या केवळ आपल्यालाच नाही, असं त्यांना समजलं.

या आजाराविषयी त्यांनी इंटरनेटवर खूप सर्चिंग केलं. त्यावेळी हा आजार पोटाचा नसून घश्याशी संबंधित असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या आजाराला Retrograde Cricopharyngeus dysfunction असं म्हणतात. या आजारात घशातला एक स्नायू (Muscle) शिथील होऊ शकत नाही. त्यामुळे तो गॅस बाहेर टाकण्यास असमर्थ ठरतो.

हे वाचा - लेकीच्या Period leave साठी बाबाची धडपड; शाळेतील सुट्टीसाठी लढतोय लढा

त्यांना या आजारावर उपचार पद्धतीची माहिती मिळाली. त्यानंतर अजिबात वेळ वाया न घालवता 1 लाख रुपये खर्च करून त्यांनी या वर्षी जून महिन्यात उपचार करून घेतले. या उपचारांदरम्यान त्यांच्या स्नायूत बोटॉक्स इंजेक्शन देण्यात आलं. या उपचारानंतर पहिले दोन आठवडे त्यांना केवळ पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र त्यानंतर 4 आठवड्यांतच फिल अन्न खाऊ लागले आणि त्यांना ढेकरही येऊ लागले. अशा पद्धतीनं फिल यांची ढेकर न येण्याच्या समस्येतून सुटका झाली.

First published:

Tags: Health, Lifestyle