मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ऐकावं ते नवलच! आजारपणातून बरं करण्यासाठी लावली जाते रुग्णांच्या शरीराला लावली आग

ऐकावं ते नवलच! आजारपणातून बरं करण्यासाठी लावली जाते रुग्णांच्या शरीराला लावली आग

एका देशामध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी थेट त्यांच्या शरीराला आग लावली जाते! या उपचार पद्धतीला फायर थेरपी (Fire Therapy) म्हणतात.

एका देशामध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी थेट त्यांच्या शरीराला आग लावली जाते! या उपचार पद्धतीला फायर थेरपी (Fire Therapy) म्हणतात.

एका देशामध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी थेट त्यांच्या शरीराला आग लावली जाते! या उपचार पद्धतीला फायर थेरपी (Fire Therapy) म्हणतात.

चीन, 29 नोव्हेंबर: जगभरात आपल्या रोगांवर उपचार (Medical Treatments) करण्यासाठी अनेक पद्धतींचा वापर केला जातो. मोठ्या संख्येने नागरिक अ‍ॅलोपॅथिक औषधोपचार (Allopathic Treatment) करून घेतात, तर काही जण आजारपणातून बरं होण्यासाठी होमिओपॅथी (Homeopathic Treatment) किंवा आयुर्वेदिक उपचारांचा (Ayurvedic Treatment) अवलंब करतात. या उपचार पद्धती तर आपल्या सर्वांना माहिती आहेत; मात्र जगात काही ठिकाणी अशा काही उपचार पद्धतींचा वापर केला जातो, की ज्या ऐकून तुमची भीतीनं गाळण उडेल. एका देशामध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी थेट त्यांच्या शरीराला आग लावली जाते! या उपचार पद्धतीला फायर थेरपी (Fire Therapy) म्हणतात.

चायनीज फायर थेरपी (Chinese Fire Therapy) नावानं ओळखली जाणारी ही विचित्र उपचार पद्धत चीनमध्ये (Chinese Medical Treatment) अवलंबली जाते. या अनोख्या थेरपीद्वारे शरीरातल्या सर्व लहान-मोठ्या आजारांवर उपचार केले जातात. फायर थेरपीच्या माध्यमातून नैराश्य, अपचन यांपासून कॅन्सरपर्यंतच्या आजारांवर उपचार करणं शक्य असल्याचा दावा केला जात आहे.

शेकडो वर्षांपासून होतो आगीचा वापर

बाकी जगासाठी फायर थेरपी ही संकल्पना नवीन वाटत असली तरी चिनी नागरिकांसाठी ही एक नेहमीची बाब आहे. चीननं शेकडो वर्षांपासून या उपचार पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. या उपचारामध्ये सर्व असाध्य रोग बरे करण्याची क्षमता आहे, असा चिनी नागरिकांना विश्वास आहे. चीन हा एकमेव असा देश आहे, ज्याचा अशा प्रकारच्या थेरपीवर विश्वास आहे. अनेक गंभीर आजारही यातून बरे झाल्याचा दावा केला जात आहे. या पारंपरिक चिनी उपचार पद्धतीमध्ये, शरीरावर गरम आणि थंड तापमानाचं संतुलन केलं जातं. चिनी भाषेत त्याला 'क्यूई' आणि 'क्झी' म्हणतात. चीनमध्ये या दोन घटकांना जीवनाचे प्रेरक घटक मानलं जातं. चीननंतर आता ऑकलंड आणि इजिप्तमध्येही या थेरपीचा वापर सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा- Personal Loan: या बँकांमध्ये मिळतंय सर्वात कमी दराने पर्सनल लोन, इथे तपासा यादी

कसा केला जातो फायर थेरपीचा अवलंब?

या थेरपीमध्ये, ओल्या टॉवेलवर थोडंसं अल्कोहोल (Alcohol) ओतलं जातं. तो टॉवेल थेट रुग्णाच्या त्वचेवर ठेवून त्याला आग लावली जाते. त्यातून निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे शरीराला फायदा होतो, असं मानलं जातं. या थेरपीमध्ये आगीशिवाय, काही हर्बल पेस्टदेखील रुग्णाच्या शरीरावर लावल्या जातात. अ‍ॅक्युपंक्चर पॉइंटमध्ये (Acupuncture point) सुईच्या मदतीनं उष्णता आत पोहोचवली जाते. प्रामुख्यानं सांधेदुखी, खांदेदुखी, सर्व्हायकल पेन, आर्थ्रायटिस यासारख्या आजारांवर उपचार घेण्यासाठी या थेरपीचा वापर होतो. यातून इतर आजारही बरे होत असल्याचा दावा केला जातो. फायर थेरपी ही चीनची पारंपरिक उपचार पद्धत असली, तरी आता 'कुआन जियान' ही तेथील हर्बल औषध उत्पादक (Herbal medicine formulation) कंपनीदेखील त्याचा प्रचार करत आहे.

First published:

Tags: China, Viral news