मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

'लग्न का करायला हवं, त्याऐवजी...', लग्नाबाबत मलाला युसूफझाईच्या वक्तव्याने उठलं वादळ

'लग्न का करायला हवं, त्याऐवजी...', लग्नाबाबत मलाला युसूफझाईच्या वक्तव्याने उठलं वादळ

मलाला युसूफझाईने लग्नाविषयी ((Malala Yousafzai on marriage) केलेल्या वक्तव्यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.

मलाला युसूफझाईने लग्नाविषयी ((Malala Yousafzai on marriage) केलेल्या वक्तव्यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.

मलाला युसूफझाईने लग्नाविषयी ((Malala Yousafzai on marriage) केलेल्या वक्तव्यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.

इस्लामाबाद, 10 जून : पाकिस्तानी समाजसेविका आणि शांततेचा नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई (Malala Yousafzai) नुकतीच ब्रिटिश व्होग (British Vogue) मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकली. हे मुखपृष्ठ (Cover page) जोरदार व्हायरल (Viral) होत असून, युसूफझाई हिने लग्नाविषयी ((Malala Yousafzai on marriage) केलेल्या वक्तव्यामुळे पाकिस्तानी सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा रंगली आहे.

या माध्यमातून मलालाने राजकारण ते संस्कृती अशा अनेक विषयांवर तसेच वैयक्तिक आयुष्याविषयी मनमोकळेपणाने संभाषण केलं आहे. पण तिने लग्नाविषयी केलेल्या टिप्पणीमुळे अनेकजण दुखावले गेले.

लग्नाविषयी बोलताना मलाला म्हणाली, "प्रत्येक जण सोशल मीडियावर त्यांच्या रिलेशनशीप स्टोरीज शेअर करताना पाहिलं की चिंता वाटते. तुम्ही एखाद्यावर विश्वास ठेवता किंवा नाही... याची खात्री तुम्ही कशी द्याल. लोकं लग्न का करतात, हे मला अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाही. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती हवी असेल तर तर विवाहासंबंधी कागदपत्रांवर स्वाक्षरी का करावी लागते. ती फक्त पार्टनरशिप का असू शकत नाही."

हे वाचा - कोरोनामुळं भारतात अडकलेल्या विदेशी नागरिकांच्या व्हिसामध्ये 31 ऑगस्टपर्यंत वाढ

या टिप्पणीमुळे पुराणमतवादी पाकिस्तानींनी सोशल मीडियावर वादळ उठवलं आहे. तिने तरुण मुलांची मनं भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला असून, तिची ही बेजबाबदार विधानं इस्लामी तत्वांच्या विरुद्ध आहेत, असे आरोप मलालावर करण्यात आले आहेत. काहींनी मलालावर पाश्चात्य संस्कृतीचं (Western Culture) अनुकरण केल्याबद्दल टिका केली आहे. तर काहींनी तिला पवित्र विवाह संस्थेच्या पवित्र नियमांबद्दल नकारात्मक कल्पनांचा प्रचार केल्याबद्दल दोषी ठरवलं आहे.

ब्रिटीश व्होगचे मुखपृष्ठ व्हायरल झाल्यानंतर काही दिवासांतच लग्न आणि मलाला हे विषय सोशल मीडियावर ट्रेंड (Trend) होऊ लागले आहेत. तसंच यावरील काही कॉमेंटस आक्षेपार्ह स्वरुपाच्या आहेत. या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना एक युजर म्हणतो की, मलालाचे विचार ऐकून दुःख झाले. दुसरी एक युझर म्हणते की, मी तिला पाठिंबा देत नाही, ही गोष्ट माझ्यासाठी गर्वाची आहे.

पाकिस्तानी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल मथिरीरा (Model Mathrira) यांनीही मलालाच्या वक्तव्यावर टीका केली आहे. याबाबत मथिरीरांनी इन्स्टाग्राम (Instagram) पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "मलाला, कृपया आपण या पिढीला शिकवलं पाहिजे की निकाह ही सुन्नत आहे. आपण काही प्लॉट खरेदी करत नसल्याने हे फक्त कागदावर सही करण्यासारखं नाही. आपण फक्त जबरदस्तीने किंवा अपमानास्पद विवाह तसंच बालविवाह अशा प्रकारच्या लग्नांचा नकारात्मक विचार केला पाहिजे"

हे वाचा - अरे बापरे! उन्हामुळे चेहऱ्याची अशी भयंकर अवस्था तुम्ही कधीच पाहिली नसेल

अनेक उदारमतवादी आणि मलालाच्या समर्थकांनी मात्र मानवी हक्क कार्यकर्तीच्या बचावासाठी धाव घेतली आहे.

व्होगच्या इन्स्टाग्रामवरील अधिकृत पेजने या 23 वर्षीय कार्यकर्तीच्या कव्हर इमेजेस शेअर केल्या आहेत. त्यांनी फॉरेस्ट फ्रेंडली विस्कोज आणि लेस शर्टमधील मलालाचा लूक शेअर करताना लिहिले आहे की, इतिहासातील सर्वात लहान नोबेल शांतता पुरस्कार विजेतीही अधूनमधून जीवन गमवण्यापासून मुक्त नाही. पुढच्या 10 वर्षांच्या कालावधीत तू स्वतःला कुठे पाहतेस असा प्रश्न मलालास विचारताच तिने सांगितले की, हा प्रश्न दररोज रात्री मला पडतो. मी पुढे काय करणार आहे, या विचारात मी तासनतास झोपून राहते.

ब्रिटीश व्होगच्या जुलै 2021च्या कव्हर स्टारने दोन दशकांपेक्षा अधिक काळ मुलींच्या शिक्षणासाठी लढा दिला आहे. तालिबानने (Taliban) महिलांना शिक्षण (Womens Education) देण्यास नकार दिला होता. याविरोधात सुरू केलेल्या मोहिमेदरम्यान 2012 मध्ये युसूफझाईवर एका तालिबानी बंदुकधारी व्यक्तीने हल्ला करत तिच्या डोक्यात गोळी घातली होती. मात्र या जीवघेण्या हल्ल्यातून मलाला वाचली. त्यानंतर 2020 मध्ये तिने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून पदवी प्राप्त केली.

First published:

Tags: Marriage, Nobel peace prize, Pakistan, Wedding