नवी दिल्ली, 4 सप्टेंबर : कोरोनाच्या काळात (Corona Period) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांप्रमाणे घरगुती गणेशोत्सवावरही सरकारने कडक निर्बंध (Restrictions) घातले आहेत. घरगुती गणपतीच्या मूर्ती या 2 फुटांपेक्षा जास्त असू नयेत असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे यावेळी घरी लहानच गणेश मूर्ती आणावी लागणार आहे. तर, विसर्जनावरही निर्बंध आहेत. घरगुती गणपतीच्या विसर्जनाला 5 माणसांची परवानही आहे.
शक्यतो घरीच विसर्ज करण्यास सांगण्यात आलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर इको फ्रेन्डली गणेशमूर्ती आणण्यावर आपणही भर द्यायला हवा.
तसंतर फार पूर्वीपासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांमुळे होणारं जल प्रदूषण पाहता लोकांचा कल हा इको फ्रेन्डली मूर्ती आणण्याकडे असतो. तरीही काही लोक मोठ्या मूर्ती घेताना प्लॅस्टर ऑफ फॅरिसच्याच घेतात. पण, आपण ज्या गणरायाची 10 दिवस मनोभावे आराधना करतो. त्या बप्पाला विर्जीत केल्यावर कधी पाहिलं आहे का ? नसेल पाहिल तर जरूर पाहा. ती परिस्थिती पाहून नक्कीच प्लॅस्टर ऑफ फॅरिसच्या मूर्तीचा हट्ट सोडून द्याल.
(
वाढत्या वयानुसार का येतो थकवा? पाहा कारणं आणि उपाय)
पण, मग प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीला पर्याय कोणता हा विचार मनात येत असेल तर, त्याचंही उत्तर आहे. प्लॅस्टर ऑफ फॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडूच्या, लाल मातीच्या, कागदाच्या, संगमरवरी किंवा अगदी घरातल्याच मूर्तीची स्थापना करू शकता.
शाडू किंवा लाल माती
प्लॅस्टर ऑफ फॅरिसच्या मूर्तीपेक्षा शाडू किंवा लाल मातीच्या मूर्ती पाण्यात लवकर विरघळतात. ही मूर्ती घरीच विसर्जीत केली तरी चालते. म्हणजे कोरोना काळात विसर्जानासाठी सार्वजनिक ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. घरीच एखाद्या हौदात, बादली, टाकीत विसर्जन करू शकता आणि हे पाणी झाडांना घालू शकता.
(
चाणक्यनीती: चांगल्या वाईटातलं छोटं अंतर... या 5 गोष्टी ठरवतात माणसाला सज्जन)
झाडाच्या बिया असलेली मूर्ती
हल्ली मार्केटमध्ये मातीच्या मूर्तींमध्येच रोपांच्या बिया टाकलेल्या असतात. अशा मूर्तींचं विर्जन एखाद्या मोठ्या कुंडीत केलं तर काही दिवसांनी त्याच मातीत रोपं येतात.
कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या मूर्ती
हल्ली कागदाच्या मूर्तीसुद्धा मिळतात. या मूर्त्या विसर्जनानंतर पाण्यात सहज विरघळतात. त्यामुळे पर्यावरणाचं नूकसान होत नाही.
(
व्हायचं नसेल ‘Emotional Fool’ तर अशाप्रकारे भावनांवर ठेवा ताबा; वापरा 8 Tips)
शेण आणि कागद
तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण, आता कागद आणि शेण यांच्या मिश्रणापासून तयार केलेल्या मूर्ती मिळू लागल्या आहेत. पण, यांच्या किंमती थोड्या जास्त असतात.
याशिवाय घरातील गणपतीची मूर्ती किंवा संरगरवराची मूर्ती गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापन करून आणि इको फ्रेन्डली सजावट करावी. पारंपारिक पद्धतीन घरीचं या मूर्तीचं विसर्जन करून देव्हाऱ्यात ठेवावी. यामुळेही पर्यावरणाची हानी टळेल.
शिवाय या वर्षी थर्माकॉलची मखर आणण्यापेक्षा फुलांची, कागद वापरून, साडी किंवा घरातले कापड वापरून, पुठ्ठ्याची सजावट करता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.