मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

वाढत्या वयानुसार का येतो थकवा? पाहा कारणं आणि उपाय

वाढत्या वयानुसार का येतो थकवा? पाहा कारणं आणि उपाय

वाढत्या वयानुसार लोकांना जास्त थकवा (Fatigue) यायला लागतो आणि काम करण्याची क्षमता कमी व्हायला लागते.

वाढत्या वयानुसार लोकांना जास्त थकवा (Fatigue) यायला लागतो आणि काम करण्याची क्षमता कमी व्हायला लागते.

वाढत्या वयानुसार लोकांना जास्त थकवा (Fatigue) यायला लागतो आणि काम करण्याची क्षमता कमी व्हायला लागते.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : वयस्क व्यक्तींना पायऱ्या चढताना, चालताना किंवा कोणतीही फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी करताना थकवा (Fatigue While doing Physical Activity) जाणवतो शिवाय वय वाढल्यामुळे कोणतंही काम करताना थोडासा आराम किंवा छोट्या झोपेचीही आवश्यकता वाटते. कधीकधी तर दररोजची कामं (Daily Chores) करतानाही वयस्क लोकांना (Older People) अडचण येते. ‘कॅन्डल अ‍ॅट होम’ (Candle at Home) या मासिकानुसार वाढत्या वयामुळे दिसणारं हे सामन्य लक्षण आहे. त्यामुळे मेडिकल इश्‍यू (Medical Issues) किंवा मानसिक थकवा (Mental Fatigue) जाणवतो. पाहुयात कोणत्या कारणांमुळे वाढत्या वायामुळे थकवा जाणवायला लागतो.

मेडिकल प्रॉब्लेम

वय जसजसं वाढत जातं तसतसं लोकांना डायबेटिज, शुगर, हिमोग्लोबिनची कमतरता, अ‍ॅनिमिया, हृदय विकार, हाडाचे विकार व्हायला लागतात. फुफ्फुसांचे विकार वाढायला लागतात. त्यामुळे थकवा जाणवायला लागतो. जर वय वाढल्यामुळे सतत थकवा जाणवत असेल तर, त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा. वर्षातून एकदातरी फुल बॉडी चेकअप करावा.

(फक्त फळं खाल्ल्यानेही होतं युरिक ॲसिड कमी; पाहा काय खावं काय टाळावं)

अपूरी झोप

फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी कमी झाल्याने रात्री गाढ झोप लागत नाही. त्यामुळे अपुऱ्या झोपेचा त्रास वयस्क व्यक्तींमध्ये दिसतो. डाबेटिज असलेल्या व्यक्तींना रात्री लघवीसाठी उठावं लागतं. त्यामुळेही झोपमोड होते. त्यामुळे एकदा उठल्यावर झोप न लागल्याने दिवसभर थकवा वाटत राहतो.

मोश्नल इश्युज

बऱ्याचवेळा जेष्ठ लोकांना आपल्या भवितव्याची चिंता वाटत असते. काही लोक एकटेपणा आणि डिप्रेशनचेही शिकार होतात. मोठी मुलं वेगळी रहायला लागली की जेष्ठ व्यक्तींना एकटेपणा जास्त जाणवायला लागतो. त्यामुळे इमोश्नल इश्युमुळे त्यांना थकवा जाणवतो.

(नैराश्यातून प्रेरणेकडे! मुंबईची 'वजनदार' डान्सर बदलतेय Belly Dancer ची प्रतिमा)

लाइफस्टाइल हॅबिट्स

रोजच्या जीवनातल्या काही सवयीही थकवा येण्याच्या त्रासाला कारणीभूत ठरतात. कॅफिनयुक्त किंवा मद्य जास्त प्रमाणात घेणाऱ्यांनाही हा त्रास होतो. त्यांना पुरेशी झोप मिळत नाही आणि फ्रेश वाटत नाही.

(वैतागू नका, घाम येणं आहे चांगलं! आरोग्यासाठी मिळतात अविश्वासनीय फायदे)

हे उपाय फायद्याचे

दररोज हेल्दी आहार घ्यायला सुरुवात करा.

वाढत्या वयानुसार व्यायाम करत राहिलं पाहिजे.

धुम्रपानाची सवय असेल तर, ती बंद करावी.

रिकाम्या वेळात वेगवेगळे विचार मानत यायला लागतात. त्यामुळे स्वत:ला बिझी ठेवा.

कोणत्याही क्षणाचा आनंद घ्यायला शिका.

या वयात सोबतीची गरज असते. त्यामुळे सामाजिक कामात व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा.

कॉफी किंवा मद्यपानाची सवय असेल तर कमी करा.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Old man, Old woman