Home /News /lifestyle /

चाणक्यनीती: चांगल्या वाईटातलं छोटं अंतर... या 5 गोष्टी ठरवतात माणसाला सज्जन किंवा दुर्जन!

चाणक्यनीती: चांगल्या वाईटातलं छोटं अंतर... या 5 गोष्टी ठरवतात माणसाला सज्जन किंवा दुर्जन!

चाणक्यनीतीमध्ये सज्जन (Gentleman) आणि वाईट (Wicked)व्यक्तींमध्ये कोणता फरक असतो, तो कसा ओळखायचा याबद्दल काय सांगितलेलं आहे.

माणसाला जीवनात (Life) योग्य मार्गदर्शन मिळालं, तर तो उत्तम प्रगती करू शकतो. तसंच उत्तम माणूस म्हणून जीवन जगू शकतो. परंतु, प्रत्येकाला असं मार्गदर्शन किंवा मार्गदर्शक मिळतोच असं नाही. एखाद्या सुज्ञ व्यक्तीला जीवनाच्या एखाद्या वळणावर अशा मार्गदर्शकाची गरज भासली तर तो ग्रंथ, पुस्तकं, ऐतिहासिक संदर्भांची मदत घेतो. अशा ग्रंथांमध्ये चाणक्यनीतीचं (Chanakya Niti) स्थान अव्वल आहे. कारण त्यात जीवनाविषयीचं सखोल तत्त्वज्ञान सामावलेलं आहे. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे असं महान व्यक्तिमत्त्व होतं, की ज्यांनी आपली विद्वत्ता, बुद्धिमत्ता आणि क्षमतेच्या बळावर भारतीय इतिहासाचा प्रवाह बदलवला. चाणक्यनीतीमध्ये त्यांनी मांडलेली तत्त्वं आणि धोरणं अनेक शतकांनंतर आजही कालसुसंगत आहेत. आजही आपल्याला योग्य-अयोग्य, पाप-पुण्य आणि नैतिकता-अनैतिकतेचं शिक्षण या सिद्धांतामधून मिळतं. चाणक्यनीतीमध्ये सज्जन (Gentleman) आणि वाईट (Wicked)व्यक्तींमध्ये कोणता फरक असतो, तो कसा ओळखायचा याबद्दल काय सांगितलेलं आहे, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बुद्धिदेवतेचे 'हे' 5 गुण आत्मसात केलेत, तर सहज गाठता येईल यशाचं शिखर एखाद्याच्या कुळाची आणि ज्ञानाची तुलना करणं आणि दोघांपैकी कोण सर्वोत्तम आहे हे ठरवणं योग्य आहे का, हेदेखील आपण जाणून घेणार आहोत. चाणक्यनीतीमधील 5 महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊ या. सज्जन व्यक्तीची ओळख चाणक्यनीतीनुसार, जेव्हा प्रलयाची स्थिती निर्माण होते, तेव्हा समुद्र सगळ्या मर्यादा, किनारे तोडतो. परंतु, सज्जन व्यक्ती प्रलय, भयंकर संकटातही आपली मर्यादा ओलांडत नाही. साप (Snake) आणि दुष्ट व्यक्तीतील फरक चाणक्यनीतीनुसार, एक दुष्ट व्यक्ती आणि एक साप यांच्यात एक फरक आहे. आपल्या जीविताला धोका आहे असं वाटतं, तेव्हाच साप दंश करतो; मात्र दुष्ट व्यक्ती पदोपदी हानी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करते. पुढचे 3 वर्षे ‘या’ 4 राशींसाठी सुखाचा काळ; मिळणार शनिदेवांची कृपादृष्टी व्यक्ती जन्मतःच महान नसते आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, रूप आणि तारुण्याने परिपूर्ण असलेला आणि कुलीन कुटुंबात जन्मलेला, परंतु ज्ञान नसलेला माणूस पळसाच्या फुलासारखा असतो. कारण या फुलाला सौंदर्य असतं, परंतु सुगंध नसतो. सौंदर्याची व्याख्या चाणक्यनीतीनुसार, कोकिळेचं सौंदर्य तिच्या गायनात आहे. स्त्रीचं सौंदर्य तिच्या कुटुंबाविषयी असलेल्या समर्पणात आहे. एका कुरुप माणसाचं सौंदर्य त्याच्या ज्ञानात, तर तपस्वीचं सौंदर्य त्याच्या क्षमाशीलतेत आहे. याला शत्रू नाही चाणक्यनीतीमध्ये म्हटल्यानुसार, शक्तिशाली लोकांसाठी कोणतं काम कठीण आहे? व्यापाऱ्यांसाठी कोणती जागा दूर आहे? मात्र विद्वानांसाठी, देश, परदेश नसतो आणि मितभाषी लोकांचा (गोड बोलणाऱ्या) कोणीही शत्रू नसतो.
First published:

Tags: Acharya chanakya, Chanakya niti

पुढील बातम्या