मुंबई, 26 एप्रिल : दररोज कोरोना रुग्णांचा वाढता आकडा अशाच बातम्या समोर येत होता. पण आज मात्र राज्यातील कोरोनाचा (Coronavirus in Maharashtra) दिलासादायक असा आकडा समोर आला आहे. नव्या कोरोना रुग्णांपेक्षा (Corona recover patient) बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णांचं (Corona new cases) प्रमाण सर्वाधिक आहे. राज्यात आज एकूण ४८,७०० नव्या कोरोना रुग्णांचं निदान झालं आहेत. तर 71,736 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार 26 एप्रिल, 2021 रोजी राज्यात 71,736 रुग्ण बरे होऊन घरी त्यानंतर एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 36,01,796 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरं होण्याचा दर म्हणजे रिकव्हरी रेट 82.92 टक्के आहे.
कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा दिवसात राज्यभरात ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. आज ७१ हजार ७३६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यात सर्वाधिक १३ हजार ६७४ रुग्ण पुणे येथील आहेत.
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 26, 2021
सर्वात जास्त रुग्ण बरे झाले आहेत ते पुण्यात. इथं सर्वाधिक 13,674 रुग्ण बरे झाले आहेत. याच पुण्यात राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर पुणेकरांनी कोरोनावर यशस्वीरित्या नियंत्रणही मिळवलं. पण पुन्हा कोरोनाने हातपाय पसरले आणि आता मात्र पुण्यातील कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा हा पुणेकर पुन्हा कोरोनावर यशस्वीरित्या मात करणारच, हेच दाखवत आहे.
हे वाचा - कोरोना लशीबाबत मोठा निर्णय होणार? लस उत्पादक कंपन्यांकडे केंद्राने केली एक मागणी
दररोज अंदाजे 2.75 लाख चाचण्या होतात. रविवारी जवळपास 2.25 लाख चाचण्या झाल्या आहेत. वीकेंड, सुट्टी यामुळे दर सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा कमी होतो. पण तरी कोरोनाचा आलेख घसरत असल्याचे हे संकेत आहेत, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. कारण गेल्या रविवारी कोरोना रुग्णांचा आकडा यापेक्षाही जास्त होता.
हे वाचा - BMC म्हणतेय, 1 मेपासून 18+ मुंबईकरांना कोरोना लस नका देऊ कारण...
राज्यात 48,700 नवे रुग्ण सापडले त्यानंतर एकूण कोरोनाबाधितांसाच आकडा 43,43,727 झाला आहे. त्यापैकी 6,74,770 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. म्हणजे इतक्या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus