केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला त्यांच्या कोरोना लशीच्या किंमती आणखी कमी करण्याबाबत विचारणा केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. आता या कंपन्यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या कंपनी आपल्या लशीची किंमत कमी करणार का? आणि किती? याचीच प्रतीक्षा आता सर्वांना आहे. हे वाचा - BMC म्हणतेय, 1 मेपासून 18+ मुंबईकरांना कोरोना लस नका देऊ कारण... केंद्र सरकारमार्फत सरकारी लसीकरण केंद्रात 45+ व्यक्तींचं मोफत कोरोना लस दिली जाते आहे. आता 18+ नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. काही राज्यांनी आपल्या राज्यात मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातही याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. देशात 16 जानेवारी, 2021 पासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली. त्यानुसारच टप्प्याटप्प्याने लसीकरण केलं जातं आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोना लस देण्यात आली. केंद्र सरकारने लसीकरणाचा प्राधान्यक्रम ठरवला. त्यानंतर 1 मार्चपासून ज्येष्ठ आणि इतर आजार असलेल्या 45 पेक्षा जास्त वयांच्या नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात आलं. 1 एप्रिलपासून 45 पेक्षा जास्त वयाच्या सर्वच नागरिकांना कोरोना लस देणं सुरू झालं. आता 1 मेपासून 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे. हे वाचा - ...तर तुम्ही कोरोना लस घेऊ नका; लस उत्पादक कंपन्यांनीच दिला सल्ला आतापर्यंत केंद्र सरकारला लस उत्पादक कंपन्या लस पुरवत होता आणि मग केंद्रामार्फत राज्यांना लस दिली जात होती. पण आता राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयं थेट कंपन्यांकडून लस घेऊ शकतात. लस उत्पादक कंपन्या 50 टक्के पुरवठा हा राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना करणार आहे आणि 50 टक्के केंद्र सरकारला देणार आहे.Govt asks Serum Institute, Bharat Biotech to lower price of COVID vaccines as India gears up to inoculate all aged above 18: Official sources
— Press Trust of India (@PTI_News) April 26, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.