मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /गर्लफ्रेंड बनून बायकोनंच भेटायला बोलावलं; भररस्त्यात आंबटशौकिन नवऱ्याला धू-धू धुतलं; VIDEO VIRAL

गर्लफ्रेंड बनून बायकोनंच भेटायला बोलावलं; भररस्त्यात आंबटशौकिन नवऱ्याला धू-धू धुतलं; VIDEO VIRAL

आपण जिच्याशी फोनवर बोलायचो ती गर्लफ्रेंड दुसरी तिसरी कुणी नाही तर आपली बायकोच आहे हे त्याला समजलं आणि तो पुरता हादरला.

आपण जिच्याशी फोनवर बोलायचो ती गर्लफ्रेंड दुसरी तिसरी कुणी नाही तर आपली बायकोच आहे हे त्याला समजलं आणि तो पुरता हादरला.

आपण जिच्याशी फोनवर बोलायचो ती गर्लफ्रेंड दुसरी तिसरी कुणी नाही तर आपली बायकोच आहे हे त्याला समजलं आणि तो पुरता हादरला.

भोपाळ, 04 फेब्रुवारी : घरात बायको असली तरी एखादी तरी गर्लफ्रेंड असावीच अशी हौस कित्येक पुरुषांना असते. कित्येक जण विवाहबाह्य संबंध ठेवतात. पण बायको ती बायकोच. नवऱ्यानं तिच्यापासून आपलं असं extra marital affair कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तिला त्याची माहिती मिळतेच किंबहुना ती ते शोधून काढतेच. असंच बायकोला अंधारात ठेवून सोशल मीडियावरील गर्लफ्रेंडशी चॅट करणं मध्य प्रदेशातील एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. ऑनलाइन ओळख झालेल्या गर्लफ्रेंडला तो पहिल्यांदाचा भेटायला गेला आणि त्याला मोठा धक्का बसला.

बेतूलमध्ये (Betul) एका महिलेनं मोठ्या चलाखीनं आपल्या नवऱ्याचा पर्दाफाश केला आहे. आपला नवरा वसंत लपूनछपून इतर महिलांशी बोलायचा याची कल्पना तिला होती. त्यामुळे तिनं त्याला रंगेहाथ पकडण्याचा ठरवलं. मग काय तिनं सोशल मीडियावर आपलं नाव बदलून नवऱ्यासोबत चॅटिंग सुरू केली आणि एक दिवस त्याला भेटायला बोलावलं.

" isDesktop="true" id="518897" >

पत्नीनं सांगितलं, नवरा आंबटशौकिन होता. मारहाणही करायचा. नेहमी घटस्फोटासाठीही दबाव टाकत होता. तो लपूनधपून इतर महिलांशी बोलायचा. त्यामुळे रंगेहाथ पकडण्याची योजना आम्ही आखली. मी माझं नाव आणि ओळख लपवून सोशल मीडियावर त्याच्याशी बोलणं सुरू केलं. पंधरा दिवस आम्ही बोलत होतो. त्यानंतर मी त्याला भेटायचं ठरवलं.

हे वाचा - वाघाला आला राग; पर्यटकांच्या दिशेनं वेगात धावत आला आणि... धडकी भरवणारा VIDEO

वसंतला याची पुसटशीही कल्पनाही नव्हती. त्यामुळे उत्साहात तो आपल्या नव्या गर्लफ्रेंडला पहिल्यांदाचा भेटायला गेला. ठरलेल्या ठिकाणी तो पोहोचला. तिथं एक महिला तोंड झाकून उभी होती.  वसंत तिच्या जवळ जाताच महिलेनं तिच्या झाकलेला चेहरा त्याला दाखवला आणि वसंत पुरता हादरला. आपण जिच्याशी फोनवर बोलायचो ती गर्लफ्रेंड दुसरी तिसरी कुणी नाही तर आपली बायकोच आहे हे त्याला समजलं आणि त्याला मोठा धक्का बसला.

हे वाचा - नणंद भावजय अचानक आले आमने-सामने, रस्त्यावरच सुरू झाली मारामारी, LIVE VIDEO

त्याची बायको पूर्ण तयारीनिशीच गेली होती. नवऱ्याची पिटाई करण्यासाठी तिनं आपल्या बहिणींनाही सोबत नेलं होतं. भररस्त्यात बायको आणि मेहुणींनी त्याला धू-धू धुतलं. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा रस्त्यावरील वाद सुटला.

First published:
top videos

    Tags: Madhya pradesh, Viral, Wife and husband