मुंबई, 04 फेब्रुवारी : जंगल सफारी (Jungle Safari) करताना किंवा नॅशनल पार्कमध्ये गेल्यावर वाघ, सिंह असे क्वचितच पाहायला मिळणारे हिंस्र प्राणी दिसले की जितका आनंद होतो, तितकीच धडकी भरते, अंगाला दरदरून घाम सुटतो. काही जण मोठमोठ्यानं ओरडतात तर काहींच्या तोडांतून शब्दच फुटत नाहीत. त्यातही काहीच कल्पना नसताना एखादा संतप्त जंगली प्राणी तुमच्यासमोर आला तर... काय होईल... कल्पनेनंच अंगाचं पाणी पाणी झालं ना? सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक संतप्त वाघ पर्यटकांच्या दिशेनं धावत आला आणि पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा.
संतप्त वाघाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये वाघ वेगानं पर्यटकांच्या दिशेनं धावून येतो आणि सर्वजण त्याला पाहून गार पडतात. हा व्हिडीओ रणथंबोरमधील असल्याचं सांगितलं जातं आहे.
At Ranathambhore... Wild is so uncertain @IrsAman @navinarora15 @WildLense_India @abhijitwaykos @dharamifs_HP @ParveenKaswan pic.twitter.com/oijvhOEX6W
— Pavan Kumar Mittal (@PavanKumarMitt5) February 3, 2021
व्हिडीओत पाहू शकता जंगल सफारी करत असताना एका दिशेनं एक वाघ रस्त्यावर येतो. पर्यटक आपल्या हातात कॅमेरा घेऊनच आहेत. वाघ ती गाडी पाहून इतका संतप्त होतो की तो वेगात धावत गाडीच्या दिशेनं होतं. गाडीसमोर रस्त्याच्या मधोमध उभा राहतो. पर्यटकांकडे पाहून गुरगुरतोही. वाघाचं असं रूप पाहून आपल्याच अंगावर काटा आला आहे. मग विचार करा. ज्यांनी हे प्रत्यक्ष अनुभवलं त्या पर्यटकांचं काय झालं असावं. सुदैवानं काही वेळात वाघ शांत होतो. पर्यटकांना तो काहीही करत नाही. तो आपल्या दिशेनं रवाना होतो.
याआधीदेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये काही लोक वाघाला आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करत होतो तितक्यात वाघच त्यांच्यासमोर येतो.आयएफएस अधिकारी सुसांत नंदा (Susanta Nanda) यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटवरवर पोस्ट केला होता.
Idiotitis... When human brain shuts down & mouth keeps talking.
Appreciate the anger management of the tiger. But that can’t be guaranteed in future. pic.twitter.com/dSG3z37fa8 — Susanta Nanda IFS (@susantananda3) January 21, 2021
व्हिडीओत पाहू शकता पर्यटकांनी भरलेल्या दोन गाड्या एकामागोमाग एक उभ्या आहेत. त्यांना तिथं एक वाघ दिसतो त्याला पाहताच पर्यटक गाडीत उभे राहतात आणि आपल्या हातात मोबाइल घेऊन वाघाचा व्हिडीओ काढू लागतात. इतक्यात त्यांच्यापासून काही अंतरावर असलेला हा वाघ ते पाहतो आणि तो थेट त्यांच्याजवळच येतो. तिथल्या छोट्याशा भिंतीवर वाघ अचानक येऊन उभा राहतो आणि पर्यटकांकडे रागानं पाहतो आणि पर्यटकांचा आवाज कमी होताच त्यांना काहीही न करता आपल्या मार्गानं निघून जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media viral, Tiger, Viral, Viral videos, Wild animal