हैदराबाद, 26 डिसेंबर: अभिनेता, सुपरस्टार रजनीकांत (Rajnikanth) यांची प्रकृती खालावल्याने शुक्रवारी त्यांना हैदराबादमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रजनीकांत यांना ब्लड प्रेशरचा त्रास होत होता. नुकत्याच झालेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये असं दिसून आलं आहे की, त्यांंचं बीपी अजूनही नियंत्रणात आलेलं नाही. त्यामुळे आजही त्यांना डिस्चार्ज देतील की नाही याबाबत शाश्वती नाही. जोपर्यंत त्यांचा रक्तदाब नियंत्रणात येत नाही तोपर्यंत त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखालीच ठेवलं जाणार आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पण त्यांना आरामाची गरज आहे. संध्याकाळी पुन्हा एकदा डॉक्टरांचं पथक रजनीकांत यांच्या तब्येची तपसाणी करेल. त्यानंतरच त्यांना डिस्चार्ज कधी मिळणार त्याचा निर्णय घेण्यात येईल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. ते कुणालाही भेटणार नाहीत. त्यांची मुलगी त्यांच्यासोबत आहे, ती त्यांची काळजी घेते आहे. त्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी कुणीही रुग्णालयात येऊ नये, असं आवाहन त्यांचं कुटुंब आणि रुग्णालय प्रशासनानं केलं आहे. रजनीकांत हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये अन्नाथे सिनेमाचं शूटिंग करत होते. मात्र शूटिंगच्या क्रूमधील 8 जणांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे शूटिंग थांबवण्यात आलं. अन्नाथे (Annaatthe shooting) या सिनेमाचं शूटिंग सुरू करण्यात आलं होतं. 22 डिसेंबर रोजी रजनीकांत यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली होती, मात्र त्यांचा अहवाल कोरोना नेगिटिव्ह आढळून आला होता. त्या दिवसापासून त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं होतं. मात्र सध्या त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना हैदराबादमधीलच रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तेलंगणाच्या राज्यपालांनी रजनीकांत यांच्या तब्येतीबाबत डॉक्टरांकडे विचारपूस केली आहे आणि ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे. दक्षिण भारतामध्ये रजनीकांत यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या तब्येतीची चिंता लागून राहिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.