Home /News /lifestyle /

Lunar Eclipse: चंद्रग्रहण लागलेलं असताना खाण्या-पिण्यासहित या गोष्टींची घ्या विशेष खबरदारी

Lunar Eclipse: चंद्रग्रहण लागलेलं असताना खाण्या-पिण्यासहित या गोष्टींची घ्या विशेष खबरदारी

ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते. या दरम्यान अशी अनेक कामे आहेत जी करण्यास मनाई आहे. खाण्या-पिण्याच्या बाबतीत आणि इतर कोणत्या गोष्टी टाळाव्यात याविषयी जाणून घेऊया.

    नवी दिल्ली, 16 मे : हिंदू धर्मीय मान्यतेनुसार ग्रहण लागणं अशुभ मानलं जातं. चंद्रग्रहण असो की सूर्यग्रहण या दोन्ही ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते. या दरम्यान अशी अनेक कामे आहेत जी करण्यास मनाई आहे. 2022 च्या सुरुवातीच्या महिन्यांत 15 दिवसांच्या फरकाने दोन ग्रहणे होत आहेत. पहिले ग्रहण 30 एप्रिल रोजी सूर्यग्रहणाच्या रूपात (Lunar Eclipse 2022) झाले. आता दुसरे ग्रहण 16 मे रोजी चंद्रग्रहण आहे. या दरम्यान कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात? काय करू नये, याबाबत भोपाळचे ज्योतिषी पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी माहिती दिली आहे. चंद्रग्रहण वेळ - चंद्रग्रहणाची तारीख : सोमवार, 16 मे 2022 वेळ : सकाळी 07:02 ते दुपारी 12:20 पर्यंत ग्रहण काळात काय करावे - * चंद्रग्रहणाच्या वेळी किमान तुमच्या आराध्य दैवाताचा जप करा. या काळात भजन-कीर्तन करणे उत्तम असते. * यादरम्यान कुटुंबासोबत बसून गायत्री मंत्राचा जप करावा. *ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्नपदार्थ आणि पिण्याच्या पाण्यात तुळशीची पाने टाका. असे केल्याने या गोष्टींवर ग्रहणाचा प्रभाव पडणार नाही. *ग्रहण संपल्यानंतर तुळस मिसळलेल्या पाण्याने स्नान करावे. * ग्रहणानंतर स्नान करून दान करावे. *ग्रहणाच्या वेळी तोंडात तुळशीची पाने टाकून हनुमान चालिसाचा पाठ करावा. चंद्रग्रहण काळात काय करू नये - * ज्योतिषीय मान्यतेनुसार, ग्रहणाच्या आधी कोणतेही शिजवलेले अन्न खाऊ नये. * ग्रहण काळात काहीही पिऊ नका किंवा खाऊ नका, परंतु गर्भवती महिलेने जास्त वेळ उपाशी राहिल्याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो. ग्रहणाचा कालावधी मोठा असेल तर भूक लागू शकते, शक्य असल्यास रस किंवा पाणी प्यावे, परंतु ग्रहण काळात जड अन्न घेणे टाळावे. हे वाचा - चटणी आणि औषधी गुणधर्माशिवाय पुदिन्याचा घरात इतक्या कामांसाठी आहे उपयोग * ग्रहणकाळात कात्री, पिन, सुई, चाकू किंवा चाकू यासारखी कोणतीही धारदार वस्तू वापरू नका. असे मानले जाते की, मुलाच्या जन्मानंतर बाळाच्या शरीरात जन्मखूण येऊ शकतात. * ग्रहण संपल्यानंतर स्नान करा. . * ग्रहणकाळात पूजा करू नये आणि मंदिराचे दरवाजे उघडे ठेवू नयेत, असे सांगितले जाते. * जेव्हा ग्रहण होते तेव्हा त्या काळात कोणीही झोपू नये. * चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडणे टाळावे. याचा त्यांच्या भावी बाळावर विपरित परिणाम होऊ शकतो. हे वाचा - आंबा खाल्ल्यानं वजन कमी होतं का? एका दिवसात नेमके किती आंबे खाणे आहे योग्य * मान्यतेनुसार ग्रहणकाळात झाडांनाही हात लावू नये. * ग्रहणकाळात कोणत्याही व्यक्तीने तीक्ष्ण व टोकदार वस्तू हातात धरू नये, वापरू नयेत. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर अंवलंबून आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Eclipse, Lifestyle

    पुढील बातम्या