Lunar Eclipse 2020 : चंद्रग्रहणाचा 12 राशींवर काय होणार परिणाम जाणून घ्या

Lunar Eclipse 2020 : चंद्रग्रहणाचा 12 राशींवर काय होणार परिणाम जाणून घ्या

5 जुलैला छायाकल्प चंद्रग्रहण होणार आहे. या चंद्रगहणाचा राशीवर कसा परिणाम होणार आहे वाचा सविस्तर.

  • Share this:

मुंबई, 02 जुलै : जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात 5 तारीखला चंद्रग्रहण होणार आहे. जसा या ग्रहणाचं खगोलशास्त्रीय आणि वैज्ञानिकांसोबतच ज्योतिषशास्रात देखील या ग्रहणाला महत्त्व आहे. या दिवशी चंद्राचं प्रत्येक राशीत असणारं स्थान आणि त्याचा परिणाम कसा होणार आहे जाणून घ्या.

मेष- चंद्र नवव्या घरात असल्यानं हे ग्रहण आपल्यासाठी चांगलं असणार आहे. मन थोडं विचलित झालं तरी प्रगतीपथावर वाटचाल कराल.

वृषभ- चंद्र आठव्या घरात असणार आहे. या वेळी आपण कोणतेही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्या काळासाठी हा थोडा प्रतिकूल असेल. तसेच ग्रहणकाळात आपल्याला संसर्ग होण्याचा धोका उद्भवेल.

मिथुन- चंद्र सातव्या घऱात असणार आहे. जोडीदारासोबत नात्याला उभारी मिळेल. परिणाम शुभ मिळतील. घाईत निर्णय घेऊ नयेत अन्यथा नुकसान शक्य.

कर्क- चंद्र सहाव्या घरात असेल. ज्यामुळे तुमच्यात भावनिक उर्जा व उत्साह वाढेल. आरोग्य सुधारण्याकडे लक्ष द्यायला हवं.  तुम्हाला येत्या काळात यश मिळण्याची शक्यता आहे.

सिंह- चंद्रग्रहण पाचव्या घरात होईल, ज्यामुळे आपल्याला शुभ परिणाम दिसतील खासकरुन प्रेमसंबंधित प्रकरणांमध्ये आपल्याला आपल्या भूतकाळाचा प्रत्येक वाद मिटविण्याची संधी मिळेल.

कन्या- कौटुंबिक प्रश्न सोडवाल. जमीन खरेदीच्या व्यवहारत लक्ष द्या. प्रत्येक बाबतीत काळजीपूर्वक विचार करा.

तूळ- आपलं धौर्य वाढल्यानं धाडस कराल. जे तुम्हाला कार्यक्षेत्रात यश मिळवता येईल. व्यवसायिकांनी जोखीम स्वीकारू नये. अडचणींचा सामना करावा लागेल.

वृश्चिक- कौटुंबिक आणि आर्थिक जीवनात आघाडीवर असाल. खर्च हाताबाहेर जातील त्यामुळे मोठं आर्थिक संकट ओढवेल.

धनु- धनु राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण खूप महत्त्वाचं असणार आहे. आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. खाण्यापिण्याची काळजी घ्या. योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मकर - वैवाहिक जीवनावर या ग्रहणाचा परिणाम दिसेल. जोडीदारासोबत वाद उद्भवतील.

कुंभ- उत्पन्न आणि सन्मान वाढवणारं असेल. आर्थिक लाभ होईल. कर्जाच्या भानगडीत पडू नका.

मीन- ध्येय डोळ्यासमोर ठेवून अधिक मेहनत करावी लागले. इच्छा आणि भावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.

संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

First published: July 2, 2020, 12:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading