मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /LPG Safety Tips: किचनमध्ये गॅसजवळ अजिबात करू नका ‘या’ चुका, होऊ शकतं मोठं नुकसान

LPG Safety Tips: किचनमध्ये गॅसजवळ अजिबात करू नका ‘या’ चुका, होऊ शकतं मोठं नुकसान

LPG Safety Tips: किचनमध्ये गॅसजवळ अजिबात करू नका ‘या’ चुका, होऊ शकतं मोठं नुकसान

LPG Safety Tips: किचनमध्ये गॅसजवळ अजिबात करू नका ‘या’ चुका, होऊ शकतं मोठं नुकसान

LPG Safety Tips: गॅसमुळं अन्न शिजविणं सोपं झालं आहे, परंतु तो वापरताना खूप काळजी घ्यावी लागते, अन्यथा कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो.

मुंबई, 26 जुलै: पूर्वी घरोघरी चुलीवर स्वयंपाक केला जात असे. आजच्या काळात जर तुम्हाला स्वयंपाक करायचा असेल तर तुम्हाला जास्त त्रास घेण्याची करण्याची गरज नाही, कारण आता जवळपास प्रत्येकाच्या घरी एलपीजी गॅस असतो. या गॅसच्या माध्यमातून तुम्ही अगदी सहजपणे स्वयंपाक करू शकता. गॅसमुळं अन्न शिजविणं सोपं झालं आहे, परंतु तो वापरताना खूप काळजी (LPG Safety Tips) घ्यावी लागते. अन्यथा कोणताही अनुचित प्रकार व्हायला वेळ लागत नाही. उदाहरणार्थ, शनिवारी बिहारच्या सासाराममध्ये एलपीजी सिलिंडरच्या स्फोटात तीन जण भाजून गंभीर जखमी झाले. त्यामुळं असं नुकसान टाळता यावं, यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. चला तर मग एलपीजी वापरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, हे जाणून घेऊया.

या गोष्टी ठेवा लक्षात-

अंतर आवश्यक आहे-

गॅस सिलिंडर आणि स्टोव्ह जेवढे उपयुक्त, तेवढीच त्यांपासून सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे. गॅस सिलिंडर हा स्टोव्हपासून थोडा दूर ठेवावा, हे नेहमी लक्षात ठेवावं. स्टोव्ह स्लॅबच्या वर ठेवा आणि गॅस सिलेंडर खाली ठेवा, जेणेकरून सिलिंडरला आग लागणार नाही.

मुलांपासून ठेवा दूर-

तुम्हाला तुमचा गॅस सिलिंडर मुलांना पोहोचता येणार नाही, अशा पद्धतीने ठेवायला हवा. अनेक वेळा मुलं खेळत खेळत रेग्युलेटर किंवा स्टोव्ह चालू करतात. अशा परिस्थितीत अपघाताची परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळं गॅस शेगडी लहान मुलांपासून दूर ठेवणं हा उत्तम पर्याय आहे.

हेही वाचा- LIC Policy: ‘या’ पॉलिसीमध्ये जमा करा पैसे, चार वर्षात व्हाल करोडपती; पाहा डिटेल्स

गॅसची तपासणी करत रहा-

लोकांनी एकदा गॅस सिलिंडर लावल्यानंतर ते पुन्हा त्याची तपासणी करत नाहीत. पण नियमित अंतरानं गॅसची तपासणी करणं गरजेचं आहे. तुम्हाला पाईप वेळोवेळी तपासावी लागेल आणि तेथून गॅस गळती तर होत नाही ना याची खात्री करावी लागेल. त्याच वेळी, रेग्युलेटर देखील तपासणं गरजेचं आहे.

गळती हलक्यात घेऊ नका-

गळतीचा वास आल्यावर बरेच लोक ते हलक्यात घेतात. पण तुम्हाला त्याची काळजी घेण महत्त्वाचं आहे. जर गळती होत असेल तर लगेच घराच्या खिडक्या आणि दरवाजे उघडा आणि मॅच किंवा दिवे चालू करण्यास विसरू नका. त्यानंतर ताबडतोब एजन्सीशी संपर्क साधा.

First published:
top videos

    Tags: Gas, Safety