जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / VITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम

VITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम

VITAMIN D ची कमतरता; फक्त हाडंच नाही तर मेंदूवरही होतोय गंभीर दुष्परिणाम

शरीरात ड जीवसत्त्वाची (Vitamin D) कमतरता असेल तर फक्त हाडांच्याच समस्या उद्भवतात असं नाही तर मानसिक समस्याही उद्भवतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 जानेवारी :  व्हिटॅमिन डी (Vitamin D) म्हटलं की फक्त हाडांचं आरोग्य लक्षात घेतलं जातं. हाडांसाठी व्हिटॅमिन डी फायदेशीर असतं, जे आपल्याला सूर्यप्रकाशापासून मिळतं. पण शरीरात ड जीवसत्त्वाची कमतरता असेल तर फक्त हाडांच्याच समस्या उद्भवतात असं नाही तर मानसिक समस्याही उद्भवतात. व्हिटॅमिन डीचा अभाव मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम करतो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे निराशा आवश्यकतेपेक्षा अधिक वाढते. आपण क्षुल्लक गोष्टींचा विचार करायला लागतो आणि त्याने आपल्याला मानसिक त्रास होतो, असं मनोविकारतज्ज्ञ डॉ. शिवांगी पवार यांनी सांगितलं. विविध अभ्यासानुसार सूर्यप्रकाशाच्या जीवनसत्त्वाची कमतरता मानसिक विकारांशी संबंधित आहे. नैराश्य, बायपोलर डिसऑर्डर, स्किझोफ्रेनिया, ओसीडीसारखे मानसिक आरोग्याशी संबंधित आजार हे जीवनसत्त्वं, खनिजं आणि अँटीऑक्सिडंट्सच्या कमतरतेमुळे उद्भवू शकतात. हे वाचा -  संंगीतप्रेमींचं आयुष्य अधिक निरोगी! शांत झोपेसाठी ण्यासाठी MUSIC ठरेल फायद्याचं व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अनेकांना नैराश्यानं ग्रासल्याचं अभ्यासात दिसून आलं आहे. यामागील कारण म्हणजे व्हिटॅमिन डी रिसेप्टर्स संपूर्ण मानवी मेंदूमध्ये पसरलेले आहेत आणि त्यातील निम्न पातळी ही आपल्याला मानसिक विकारांचा बळी ठरवू शकते. कमी व्हिटॅमिन डी केवळ आपल्या मानसिक आरोग्यावरच परिणाम करत नाही तर उच्च रक्तदाबाशीदेखील जोडला जातो. व्हिटॅमिन डीची निम्न पातळी हायपरटेन्शनशी जोडली जाते. हे वाचा -  वय 10 वर्षे, वजन 85 किलो; मोठ-मोठ्यांना कुस्तीत सहज लोळवतो हा क्युटा! व्हिटॅमिन डीची कमतरता ही जागतिक आरोग्य समस्या आहे. पुरेसा सूर्यप्रकाश आणि पूरक आहारांद्वारे ड जीवनसत्वं घ्यायला हवं. गरजेपेक्षा अधिक प्रमाणात व्हिटॅमिनदेखील धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे त्यासाठीदेखील डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात