Home /News /lifestyle /

वय 10 वर्षे, वजन 85 किलो; मोठ-मोठ्यांना कुस्तीत सहज लोळवतो हा क्युटा!

वय 10 वर्षे, वजन 85 किलो; मोठ-मोठ्यांना कुस्तीत सहज लोळवतो हा क्युटा!

कोणत्याही सर्वसाधारण दिवशी क्युटा 2700 ते 4000 कॅलरी असलेला आहार फस्त करतो. त्या दोन वर्षांत त्याचं वजन 20 वर्षांनी वाढण्याचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलं आहे.

    टोकियोचा (Tokyo) (Japan) अवघा 10 वर्षांचा सुमो कुस्तीपटू (Sumo Wrestler) क्युटा कुमगाई (Kyuta Kumagai) त्याच्या वयाचा विचार करता उत्तम कामगिरी करतो आहे. 85 किलो वजन असलेला क्युटा त्याच्या वयाच्या मुलांच्या मानाने आकाराने दुप्पट आहे. त्याच्यापेक्षा पाच-सहा वर्षांनी मोठ्या असलेल्या मुलांनाही तो कुस्तीत सहज लोळवतो. गेल्या वर्षी त्याला 10 वर्षांखालील जागतिक चॅम्पियन (World Champion) म्हणून गौरवण्यात आलं. त्याचे वडील तैसुके (Taisuke) यांनी तिच्या प्रशिक्षणाचं वेळापत्रक ठरवलेलं आहे. त्याच्या स्थानिक सुमो क्लबमध्ये (Sumo Club) किंवा वेटलिफ्टिंग करण्याचं प्रशिक्षण तो आठवड्यातले सहा दिवस घेतो. तसंच तो पोहण्याचा व्यायामही करतो. ट्रॅक अँड फिल्डचाही सराव करतो. सुमो कुस्तीसाठी आवश्यक असलेली लवचिकता, चपळाई आणि आक्रमकता येण्यासाठी या गोष्टींचा सराव तो चुकवत नाही. तो अगदी बालवर्गात असतानाच त्याच्या वडिलांनी त्याला टुर्नामेंटमध्ये उतरवलं होतं. तेव्हापासून त्याचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे. 'मी त्याला काहीही शिकवत नाही. तो आपणहूनच विविध गोष्टी करू शकतो, करतो,' असं त्याचे वडील तैसुके यांनी सांगितलं. ते माजी हौशी सुमो आहेत. 'सुमो बनण्यासाठी विशिष्ट टॅलेंट आवश्यक असतं. त्याच्याकडे ते आहे. मला वाटलं, त्याच्याकडे काही खास आहे,' असं तैसुके म्हणाले. क्युटा खेळात आक्रमक असला, तरी बोलायला लाजाळू आहे. त्याच्या वयाच्या अनुषंगाने त्याच्या प्रेरणा अगदी साध्या आहेत. 'माझ्यापेक्षा मोठ्या मुलांना, व्यक्तींना मारण्यात मजा येते,' असं तो म्हणतो. आपल्या मुलात सुमो बनण्यासाठीचं टॅलेंट आहे, हे लक्षात आल्यावर तैसुके यांनी आपल्या कुटुंबाचं बस्तान टोकियोच्या फुकुगावा भागात हलवलं. या भागाला सुमो कुस्तीपटू घडवण्याची परंपरा आहे. तिथे बरेच सुमो क्लब्ज (Sumo Clubs) आहेत. तसंच नोमिनोसुकुने श्राइन नावाची देवस्थानं आहेत. या देवस्थानांमध्ये सुमोंच्या देवांचं वास्तव्य असतं, असं मानलं जातं. त्यामुळे तिथे सुमो घडवण्यासाठी चांगलं वातावरण आहे. वन ऑन वन ट्रेनिंग तैसुके आणि क्युटा स्थानिक देवळात करतात. तैसुके आपल्या मुलाला इतकी कठोर प्रॅक्टिस करवतात, की काही वेळा त्याचा श्वास कोंडून तो रडायलाही लागतो; पण तैसुके म्हणतात, की त्याच्यातलं सर्वोत्तम बाहेर काढण्यासाठी हाच एक मार्ग आहे. 'मला वाटतं याला खूप तणाव आहे असं काही नाही. तो यातून स्वतःसाठी आणि खेळण्यासाठी वेळ काढू शकतो,' असं तैसुके म्हणतात. हे प्रशिक्षण महागडं असतं आणि त्यात अख्ख्या कुटुंबाकडून योगदान असणं आवश्यक असतं. तसंच त्यांच्याकडे आहे. क्युटाची आई माकिको हिचंही त्यात योगदान आहे. 'मी जुगार खेळत नाही; पण या बाबतीत मी काहीही पैज लावू शकतो,' असं तैसुके म्हणतात. कोणत्याही सुमोच्या यशाचं रहस्य त्याच्या आहारात असतं. कोणत्याही सर्वसाधारण दिवशी क्युटा 2700 ते 4000 कॅलरी असलेला आहार फस्त करतो. त्यात एक लिटरहून अधिक दूध आणि मोठ्या प्रमाणात प्रथिनांचा समावेश असतो. त्यात मांस त्याला विशेष आवडतं. चाँको नाबे नावाचं सूप सुमो वजनवाढीसाठी आवर्जून पितात. तैसुकेही क्युटाला रोज एक बाउलपेक्षा अधिक सूप देतात. येत्या दोन वर्षांत त्याचं वजन 20 वर्षांनी वाढण्याचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलं आहे. तसं झालं, तर त्याला पुढच्या टप्प्यात प्रवेश करता येईल. माजी प्रोफेशनल कुस्तीपटू शिनिची तायरा हे क्युटाचे सध्याचे प्रशिक्षक आहेत. त्यांना वाटतं, की क्युटामध्ये ती क्षमता आणि टॅलेंट आहे. योकोझुना हे या खेळातलं सर्वोच्च रँकिंग आहे. तिथे पोहोचायचं उद्दिष्ट क्युटाने ठेवलं आहे; पण हे क्षेत्र मरणाकडेही नेऊ शकतं, याचीही त्याला कल्पना आहे. 'सुमोसाठीचं प्रशिक्षण हे असं असतं, की 'एंजॉय' वगैरे शब्द वापरून तुम्ही त्याचं वर्णन करू शकत नाही. जेव्हा ते अधिकाधिक कठीण बनत जातं, तेव्हा मी काही वेळा हे क्षेत्र सोडण्याचाही विचार केला होता,' असं क्युटा म्हणतो. सध्या तरी चरख्यासारख्या पिळून काढणाऱ्या यंत्रणेतून मुलगा आणि वडील या दोघांचा प्रगतीच्या दिशेने प्रवास सुरू आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Japan

    पुढील बातम्या