जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / ऑक्सिजन कमतरतेच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; या उपयांकडे विशेष लक्ष द्या

ऑक्सिजन कमतरतेच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; या उपयांकडे विशेष लक्ष द्या

ऑक्सिजन कमतरतेच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; या उपयांकडे विशेष लक्ष द्या

कोरोनाता नवा स्ट्रेन थेट फुप्फुसावर हल्ला करत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे रुग्णाची ऑक्सिजन लेवल कमी होत आहे. कोरोना थेट फुप्फुसं आणि श्वसन प्रक्रियेला प्रभावित करतो, त्यामुळे शरीरात अधिकाधिक ऑक्सिजनची (oxygen level) गरज भासते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 23 एप्रिल : देशात कोरोना संक्रमित (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन आधीपेक्षा अधिक धोकादायक ठरत आहे. हा नवा स्ट्रेन थेट फुप्फुसावर हल्ला करत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे रुग्णाची ऑक्सिजन लेवल कमी होत आहे. कोरोना थेट फुप्फुसं आणि श्वसन प्रक्रियेला प्रभावित करतो, त्यामुळे शरीरात अधिकाधिक ऑक्सिजनची (oxygen level)  गरज भासते. कोरोनामुळे शरीरात निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या कमतरतेचे गंभीर परिणाम समोर येतात. कोरोना रुग्ण (corona patients) आणि त्याच्या नातेवाईकांनी या गोष्टीकडे विषेश लक्ष देण्याची गरज आहे, की रुग्णाची ऑक्सिजन लेवल कमी होऊ नये. कोरोना रुग्णाला शरीरात ऑक्सिजनची लेवल योग्यरित्या ठेवणं गरजेचं आहे. जागतिक आरोग्य संस्था आणि सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेंशन नुसार, एका स्वस्थ आणि सामान्य व्यक्तीमध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशन लेवल 95 ते 100 टक्क्यांदरम्यान असणं गरजेचं आहे. शरीरातील रक्तात असलेलं हिमोग्लोबिन ऑक्सिजनचा वाहक असतो. हा संपूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवतो. शरीरात ऑक्सिजनची कमतरता आपल्या रोगप्रतिकारशक्तीला प्रभावित करते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे थकवा जाणवतो, श्वास फुलतो. ऑक्सिजन कमीमुळे ब्लड सर्कुलेशन कमी होतं. एवढंच नाही, तर ऑक्सिजनच्या कमीमुळे ब्रेन हॅमरेज आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. मधुमेह रुग्णांमध्ये ऑक्सिजनच्या कमीमुळे रक्तात साखरेचं प्रमाण अचानक वाढतं आणि ते धोकादायक ठरतं. ऑक्सिजनच्या कमीमुळे थायरॉईड हार्मोनचं संतुलनही बिघडतं. ऑक्सिजनच्या कमतरतेची लक्षणं (low oxygen level), या गोष्टींकडे लक्ष ठेवा - - श्वास घेण्यास त्रास - श्वास फुलणं - थकवा येणं - गोंधळून जाणं - होट आणि चेहऱ्याचा रंग निळा होणं - छातीत दुखणं किंवा जळजळ होणं - चालताना-उठताना समस्या

(वाचा -  पोटावर झोपल्याने खरंच शरीरातील Oxygen पातळी वाढते का? काय सांगतात तज्ज्ञ पाहा )

शरीरात ऑक्सिजन लेवल कशी वाढवली जाऊ शकते - जर एखाद्याची ऑक्सिजन लवेल कमी होत असेल, तर त्याला बेड किंवा जमिनीवर, पोटावर झोपण्यास सांगितलं जातं. याला प्रोन पोजिशिनिंग म्हणतात. पोटावर झोपल्यामुळे ऑक्सिजन लेवल वाढते. या पोजिशनमध्ये रुग्णाचं पोट जमिनीवर किंवा बेडवर आणि पाठ वर असावी. यामुळे फुफ्फसं वेगाने काम करतात आणि श्वास घेण्यास आराम मिळतो. डोक्याखाली, कमरेखाली उशी घेता येऊ शकते. डोकं आरामदायी स्थितीत असावं. एक-दोन तासांत पोजिशन बदलता येऊ शकते. तसंच वेळोवेळी ऑक्सिजन लेवलची तपासणी करावी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात