Coronavirus च्या दुसऱ्या लाटेमुळे बदललं युरोपातलं वातावरण; फ्रायडे नाईटचे 28 फोटो सांगतील खरी परिस्थिती
Friday Evening म्हणजे युरोपातल्या प्रसिद्ध शहरांमधले पब्ज आणि बार झगमगाटी गर्दीत न्हाऊन निघतात. पण बहुतेक सगळ्या शहरांमध्ये दुसऱ्यांदा Lockdown लागला आहे. लंडनपासून इस्तंबूलपर्यंत खरी परिस्थिती दाखवणारे 28 फोटो


युरोपातले सिटी स्क्वेअर, हायस्ट्रीट किंवा पॅरिससारख्या शहरातले मोहक बुलेवार्ड्स असोत वा रोममधल्या अरुंद गल्ल्या... फ्रायडे इनव्हनिंग असूनही ओस पडल्या आहेत. जर्मनीमधील फ्रँकफर्टमधल्या या चित्रातल्या दृश्याइतरीच शांतता भरून राहिली आहे. कारण आहे Coronavirus(Image: AP)


बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये ग्रांड प्लासइथे कर्फ्यू लागण्याअगोदर झगमगाटी फोटो घेणारा हा एकुलता एक माणूस covid लॉकडाऊनची जाणीव देणारा.


नेदरलँडमधील ऐतिहासिक अॅमस्टरडॅमच्या एका बारबाहेर ऐन संध्याकाळी रचून ठेवलेल्या रिकाम्या खुर्च्या. (Image: AP)


फ्रान्समध्ये बुधवारपासूनच नाईट कर्फ्यू लागू आहे. संचारबंदीची वेळ सुरू होण्याआधी टेरेस रेस्टोरंटमध्ये एंजॉय करताना एक जोडपं. (Image: AP)


इस्तंबूलमधील तक्सिम स्क्वेअर जवळ एका रेस्टोरंट्स, डायनिंग रूममधील काही भरलेली आणि बरीचशी रिकामी टेबलं. (Image: AP)


जर्मनीच्या बर्लिनमधील फ्रेड्रिश्चेन मध्ये Spaeti या नावाने फेमस दुकानांमध्ये उशिरापर्यंत दारू- सिगरेट मिळते म्हणून गर्दी असते. (Image: AP)


रशियाचा मोस्कोमधील एका बारमध्ये कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क घातलेला बारटेंडर (Image: AP)


बार्सिलोनाच्या लास रॅमब्लास इथली टेरेस रेस्टॉरंट्स फेमस आहेत. पण कोरोनामुळे ती बंद असल्याने रस्त्यावरून पायी भटकण्याचा आनंद घेणारे काही तरुण (Image: AP)


चेक प्रजासत्ताकची राजधानी प्राग इथे जुनी -नवी चर्चासुद्धा कोरोना भयाने रिकामी आहेत किंवा बंद आहेत. Astronomical घड्याळ ही या चर्चची ओळख (Image: AP)


जर्मनीच्या बर्लिनमधील Harald Hertel's Jam Swingers यांनी आयोजित केलेल्या ओपन डान्स इव्हेंटमध्ये डान्स करताना नागरिक.


रोममधील कॅम्पो डी 'फिओरी स्क्वेअर येथील पब आणि रेस्टोरंट बंद ठेवल्याने त्याला विरोध करण्यासाठी चित्रासह निषेध Image: AP)


फ्रान्सच्या पॅरिसमध्ये कर्फ्यू लागण्यापूर्वी रेस्टोरन्टमधील टेरेसवर ड्रिंक करताना नागरिक. (Image: AP)


सर्बियातल्या बेलग्रेड इथली दृश्य. डाऊनटाऊन बेलग्रेडच्या मुख्य बाजारातली गर्दी नेहमीच्या मानाने तुरळक.


लंडनमधील ओल्ड कॉम्प्टन स्ट्रीटवरचं रेस्टोरंट. मास्क घालून सर्व्हिस देण्यात येते आहे.. (Image: AP)