• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • OMG! चाकासारखी गोलगोल फिरतच राहिली; चिमुरडीचा Backflip Video पाहून तुम्हाला येईल चक्कर

OMG! चाकासारखी गोलगोल फिरतच राहिली; चिमुरडीचा Backflip Video पाहून तुम्हाला येईल चक्कर

चिमुरडीला Backflip मारून नाही पण तुम्हाला मोजून भोवळ येईल.

 • Share this:
  मुंबई, 20 एप्रिल : एकाच वेळी तुम्ही किती बॅकफ्लिप (Backflip) मारू शकाल. एक, दोन, तीन, चार, पाच... अरे बस्सं. इतकेच पुरेसे आहेत. यापुढे बॅकफ्लिप (Backflip video) मारणं काय? हा आकडा ऐकूनच चक्कर येईल. असंच तुम्ही म्हणाल. पण तुम्हाला तर फक्त पाच बॅकफ्लिप मारण्याचा विचार करूनच चक्कर आली. पण सध्या सोशल मीडियावर (social media) अशा चिमुरडीचा व्हिडीओ (Girl Backflip video) व्हायरल होतो आहे. जिने इतके बॅकफ्लिप मारले आहेत, जे करताना तिला चक्कर आली नाही पण मोजता मोजता तुम्हाला मात्र नक्कीच येईल. बॅकफ्लिप मारणं तसं सोपं नाही. अनेकांना यामुळे गंभीर दुखापतही होऊ शकते. कुणाला तोंडाला लागू शकतं, कुणाच्या पाठीला हानी पोहोचू शकते. त्यामुळे ब्लॅकफ्लिप मारणं सर्वांनाच जमतं असं नाही. फार फार तर अनेक जण लागोपाठ दोन-तीन बॅकफ्लिप मारतील. पण या चिमुरडीने इतके बॅकफ्लिप मारले आहेत की व्हिडीओ पाहणाऱ्याला तर ते मोजणंही शक्य नाही. रॅक्स चॅपमॅन यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक छोटीशी मुलगी एका बेडवरून बॅकफ्लिप करत थोड्या अंतरावर पुढे जाते. त्यानंतर एकाच जागेवर ती बॅकफ्लिप मारते. हे वाचा - भयंकर! तब्बल 12 मोकाट कुत्री चिमुरडीवर तुटून पडली; अंगावर काटा आणणारा VIDEO चिमुकली आता थांबेल, आता थांबेल, अरे आता तरी थांबले. असा तुम्ही विचार कराल. पण एवढीशी मुलगी काही थांबतच नाही. फ्लिपवर फ्लिप मारतच जाते. जणू काही एखादं चाकच. चाकासारखी गोलगोल ती फिरतच राहिली. आता या मुलीने किती बॅकफ्लिप मारले हे तर तुम्हाला मोजणंही शक्य होणार नाही. मोजता मोजता तुम्हाला चक्कर येईल पण त्या बॅकफ्लिप प्रत्यक्षात करणाऱ्या या मुलीला नाही. अनेक युझर्सनी तिने किती बॅकफ्लिप मारले हे मोजण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी म्हटलं आपल्याला आता चक्कर येते आहे, कुणी म्हटलं आपली पाठ दुखू लागली आहे. अनेकांनी आपला अनुभवही मांडला आहे आणि असं करणं आपल्याला तरी शक्य नाही, असं म्हणजे चिमुकलीचं कौतुकही केलं आहे. तर कुणाला हा व्हिडीओ पाहून तो खरा आहे, यावर विश्वास बसत नाही आहे. हे वाचा - कुणी माझ्या बाळाला दूध पाजेल?', कोरोनाने हिरावली आई; तान्हुल्यासाठी बापाची धडपड तुम्हाला तर इतके बॅकफ्लिप मारणं शक्य नाही. पण तुम्ही किमान हे मोजू तरी शकता का? तुम्हाला शक्य नसेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा जवळच्या व्यक्तींना ही बातमी नक्की शेअर करा. पाहा त्यांना तरी हे जमतं आहे का?
  Published by:Priya Lad
  First published: