रणजीत राणा/लखनऊ, 20 एप्रिल : भटक्या, मोकाट, पिसारळलेल्या कुत्र्यांनी (street dog) चिमुरड्यांवर हल्ला केल्याच्या बातम्या बहुतेक वेळा कानावर येत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे. ज्यात एक-दोन नाही तर तब्बल बारा कुत्र्यांनी चिमुरडीवर हल्ला (dogs attack on girl) केला आहे. गिधाडं तुटून पडावं तशी ही मोकाट कुत्री या चिमुकल्या जीवावर तुटून पडली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh) अलिगडमधील (aligarh) ही धक्कादायक घटना. भटत्या कुत्र्यांनी चिमुरडीवर भयंकर हल्ला केला आहे. ही मुलगी एकटीच रस्त्यावर जात होती. तिथं रस्त्याशेजारी काही कुत्री बसली होती. त्यांनी या चिमुरडीला पाहताच तिच्यावर ते धावून आले. सुरुवातीला दोन-तिन त्यानंतर आजूबाजूची इतर बरीच कुत्री चिमुरडीवर धावून आली.
अशी तब्बल 12 कुत्री जमा झाली. त्यांनी ओढत चिमुरडीला रस्त्याच्या एका कडेहून रस्त्याच्या मधोमध दिलं. चिमुरडी जीव वाचवण्यासाठी मोठमोठ्याने ओरडू लागली. ती त्या कुत्र्यांचा प्रतिकारही करू शकत नव्हती. कुत्र्यांनी तिला चारही बाजूंनी घेरलं होतं. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावून आले. माणसं जमा होताच कुत्रे तिथून पळाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
हे वाचा - माझा एकुलता एक मुलगा मयूरमुळेच आज जिवंत, अंधमातेनं सांगितला थरारक अनुभव
व्हिडीओ पाहूनच अंगावर अक्षरश: काटा येतो. सर्व कुत्री बाजूला हटताच चिमुरडी स्वतःच उठून बसते. कुत्र्यांच्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाल्याचं सांगितलं जातं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Shocking viral video, Viral, Viral videos