मुंबई, 25 मार्च : सिंह (Lion) म्हटला की जंगली, हिंस्र, क्रूर प्राणी. त्याच्यासमोर कोणताही जीव आला तरी तो त्याची शिकारच करणार असंच आपल्याला वाटतं. पण नाही कितीही क्रूर असला तरी या सिंहामध्येसुद्धा कुठेतरी प्रेम दडलेलं असतं. अशाच एका दयाळू सिंहाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) होतो आहे. हा सिंह पाण्यात पडलेल्या एका पक्ष्याला वाचवण्यासाठी धडपड करताना दिसतो आहे.
सिंह ज्याला जंगलाचा राजा म्हटलं जातं. राजा म्हणजे तसा वरवर कठोर असला तरी तो आतून दयाळू असतो. असाच दयाळूपणा या जंगलाच्या राजानेही दाखवला आहे. आयएफएस ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
How many of you had thought that such large carnivores has a soft heart?
They are wild. But not savages. Respect & adore them. They kill to survive & only when provoked. pic.twitter.com/RwoJ1z1Hjc — Susanta Nanda IFS (@susantananda3) March 25, 2021
व्हिडीओत पाहू शकता एक पक्षी पाण्यात पडला आहे, तो पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आहे. तितक्या एक सिंह तिथं येतो. तो त्या पक्ष्याला हात लावतो. सुरुवातीला वाटेल की सिंह त्या पक्ष्याची शिकार करायलाच आला की काय? पण नाही खरंतर तो या पक्ष्याला वाचवण्यासाठी धडपड करतो आहे.
हे वाचा - बोटीतून पक्ष्याला देत होता खाणं; समुद्रातून आला भलामोठा मासा आणि... धडकी भरवणारा
सिंह त्या पाण्यातील पक्ष्याला इतक्या नाजूकपणे हात लावतो की त्याला कोणतीही दुखापत होणार नाही. तो त्याला आपल्या पंजात धरून पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आहे. पण पक्षी काही त्याच्या पंजात येत नाही. तरी सिंह मात्र त्याला वाचवण्याचा वारंवार वार प्रयत्न करताना दिसतो. पक्ष्याच्या पाठीवरून तो मायेचा हातही फिरवतो. जणूकाही त्याच्या मनातील भीती दूर करण्याचाच तो प्रयत्न करतो.
हे वाचा - लय भारी! टिकटॉक....टिकटॉक... मॉडेल्सनाही मागे टाकेल असा कावळ्याचा कॅटवॉक
सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर करताना जंगली आहे पण क्रूर नाही असं सुंदर असं कॅप्शन दिलं आहे. अशा मांसाहारी प्राण्यात कोमल हृदयही असू शकतं, असा विचार तुमच्यापैकी किती जणांनी केला? ते जंगली आहेत पण क्रूर नाही. त्यांचा आदर करा आणि त्यांच्यावर प्रेम करा. जे फक्त जगण्यासाठी आणि कुणी त्यांना चिथवलं तरच जीव घेतात. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Wild animal