मुंबई, 08 एप्रिल : सिंह... जंगलाचा राजा... जो कुणालाही जुमानत नाही... कुणालाही घाबरत नाही... संपूर्ण जंगलावर त्याची सत्ता असते... संपूर्ण जंगलावर तो राज करतो. पण जंगलाचा राजा म्हणून मिरवणारा हा सिंह मात्र आपल्याच छाव्यांना घाबरू लागला. पिल्लांपासून दूर पळणाऱ्या अशाच एका सिंहाचा (Lion) व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होतो आहे.
एका सिंहाने आपल्या पिल्लांना जंगलाच्या मध्येच सोडून त्यांच्यापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न केला (Lion dad tries to ditch his kids). पण शेवटी ते सिंहाचेच छावे. वडिलांना आपल्यापासून दूर जाताना पाहून त्या पिल्लांनी नेमकं काय केलं ते तुम्ही व्हिडीओतच पाहा.
Running from responsibilities ain’t so easy pic.twitter.com/Gr2kKKY4eV
— Shreela Roy (@sredits) April 6, 2021
व्हिडिओत पाहू शकता एक सिंह आपल्या चार छाव्यांसोबत आहे. छावे आपल्या वडिलांच्या पावलांवर लक्ष ठेवून आहेत. जिथं जिथं वडील जातील तिथं तिथं ही पिल्लं त्याच्या मागेमागे लुटूलुटू जातात. सिंह आपल्या पिल्लांचं लक्ष चुकवून त्यांच्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो. आपल्या पिल्लांना सोडून जाण्याचा प्रयत्न करतो. जंगलाच्या मध्येच तो आपल्या पिल्लांना एकटं टाकून तिथू पळतोसुद्धा. पण शेवटी ते सिंहाचेच छावे आहेत. तेसुद्धा काही सिंहाला असंतसं जाऊ देत नाहीत. तेसुद्धा आपल्या छोट्याशा पावलांनी छाव घेतात आणि आपल्यापासून दूर पळणाऱ्या आपल्या वडिलांचा पाठलाग करतात. आपल्या वडीलांच्या पाठीमागे धावत जातात.
हे वाचा - तरुणाचा पाय तोंडात धरला आणि...; बिबट्याने केलेल्या भयंकर हल्ल्याचा VIDEO VIRAL
ट्विटर युझर श्रीला रॉय यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. जबाबदारीपासून पळणं इतकं सोपं नसतं, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. पिल्लांना सांभाळणं जसं आईचं काम आहे तसंच वडिलांचंही आहे. पण वडील सिंह मात्र पिल्लांची आई त्यांच्या सोबत नसताना त्यांना एकटं टाकून पळताना दिसतो आहे. याचाच अर्थ तो जबाबदारीपासून पळतो आहे. पण त्यापासून दूर पळालं म्हणजे जबाबदारीपासून सुटका मिळते असं नाही. जसं या पळणाऱ्या सिंहाच्या मागे त्याची जबाबदारी असलेली पिल्लंही त्याच्या मागे जातात. तसंच आपणसुद्धा कोणत्याही जबाबदारीपासून दूर पळण्याचा प्रयत्न केला तरी जबाबदारी आल्या मागे येतेच, हेच त्यांना या व्हिडीओतून सुचवायचं आहे.
हे वाचा - पक्ष्यांसाठी हाताऐवजी तोंडात धरले चिप्स, पुढे जे घडलं ते पाहून हसू आवरणार नाही
दरम्यान हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांनी रॉय यांनी या व्हिडीओतून जो अर्थ काढला त्याचं समर्थन केलं आहे तर काही जणांनी मात्र सिंह आपल्या पिल्लांना शिकवत असल्याचं, त्यांना भविष्यासाठी तयार करत असल्याचं म्हटलं आहे. आता यातून तुम्ही नेमका काय बोध घ्याल ते तुमच्यावर अवलंबून आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Wild animal