मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

राहीबाईंच्या पावलावर पाऊल, या दुर्गम भागातील महिला करताहेत देशी वाणांचं जतन

राहीबाईंच्या पावलावर पाऊल, या दुर्गम भागातील महिला करताहेत देशी वाणांचं जतन

अनेक पिकांची देशी वाणं काळाच्या ओघात लुप्त होत चालली आहेत. या महिलांनी त्यांचं जतन करण्याचा यशस्वी प्रयोग सुरू केला आहे.

अनेक पिकांची देशी वाणं काळाच्या ओघात लुप्त होत चालली आहेत. या महिलांनी त्यांचं जतन करण्याचा यशस्वी प्रयोग सुरू केला आहे.

अनेक पिकांची देशी वाणं काळाच्या ओघात लुप्त होत चालली आहेत. या महिलांनी त्यांचं जतन करण्याचा यशस्वी प्रयोग सुरू केला आहे.

  • Published by:  News18 Desk

जीवानंद हालदार

कांकेर, 11 फेब्रुवारी : महाराष्ट्राच्या पद्मश्री राहीबाई पोपेरे (Rahibai Popere) या सीड मदरचं (seed mother) नाव आणि कर्तृत्व आता जगभर पसरलं आहे. आता जणू त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत कांकेर जिल्ह्यातील महिलांनी एक अनोखी सुरुवात केली आहे.

छत्तीसगढच्या कांकेर जिल्ह्यापासून (Kanker district) 35 किलोमीटर दूर सुंदर डोंगरामध्ये वसलेल्या निशानहर्रा या गावातल्या महिलांचा (village women) हा संकल्प आहे. या महिलांनी एक गटाची स्थापना करत विविध बियांचं (seeds) जतन (protect) करण्याची सुरवात केली आहे. काळाच्या ओघात लुप्त होत असलेल्या बिया ही या महिला वाचवून ठेवत त्यांचं संवर्धन करत आहेत.

या बियांचा फायदा शेतकऱ्यांना (farmers) मिळावा हा या महिलांचा उद्देश आहे. कांकेर जिल्ह्यापासून 35 किलोमीटरवर डोंगरांमध्ये हे निशानहर्रा गाव वसलेलं आहे. या गावातील 200 महिलांनी एकत्र येत एक गट (group) स्थापन केला आहे.

पाहा PHOTO: राहीबाई पोपेरे यांनी संकटांवर मात करून उभारली 'बीज बँक'

या गटानं बियांची बँक (seed bank) सुरू केली आहे. विविध पिकांच्या लुप्त होत असणाऱ्या प्रजातींच्या बिया हा समूह गोळा करत त्यांचं जतन करतो आहे.

हेही वाचा एक एकरमध्ये 10 लाखांचं उत्पन्न; डॉक्टरने सुरू केलेल्या शेतीची देशभरात चर्चा

समूहाच्या महिलांनी सांगितलं, की 20 प्रकारच्या बिया पारंपरिक पद्धतीनं मातीच्या भांड्यात (earthen pot) आम्ही ठेवत आहोत. या गटाच्या अध्यक्ष राम बाई यांनी सांगितलं, की आम्हा महिलांचं हे स्वप्न आहे, की एकेदिवशी सगळ्या लुप्त होत असलेल्या बिया आम्ही जमवलेल्या असतील. यातून शेतकऱ्यांना खूप मोलाची मदत होईल. तीळ, विविध धान्यं, डाळी अशा पिकांच्या देशी वाणांच्या बिया या महिलांचा समूह संरक्षित करतो आहे.

दुसऱ्या सदस्य राधा सांगतात, की जुन्या काळात शेतकरी एकमेकांच्या मदतीनं पिकांची पारंपरिक वाणं सुरक्षित ठेवायचे. त्यांचं आदानप्रदान करायचे. शेतीच्या कामातही एकमेकांची मदत करायचे. आता मात्र हे थोडं कमी झालंय. म्हणून आम्ही हा प्रयोग करतो आहोत.

First published:

Tags: Chattisgarh, Seed bank, Seed mother, Women empowerment