केंद्र सरकारकडून 71 व्या गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील बिजमाता राहीबाई पोपेरे या ‘पद्मश्री’ पुरस्कारच्या मानकरी ठरल्या आहेत. दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्त राहीबाई यांचा पद्मश्री सन्मान होणार आहे.
संकटांवर मात करून उभारली ‘बीज बँक’ देशी बियाणं गोळा करून महाराष्ट्रात शेती संवर्धानाचं मोठे काम उभे करणाऱ्या राहीबाई पोपेरे यांच्या कामाची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. राहीबाई यांनी संकटावर मात करून ‘बीज बँक’ उभारली आहे. या बीज बँकेचं लोकार्पण माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले होते. ‘न्यूज18 लोकमत’ने यासाठी पाठपुरावा केला होता. चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन आणि आर्थिक मदत मिळवून राहिलीबाईंचे स्वप्न पूर्ण झाले.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या एक आदिवासी महिलेचा सर्वोच्च पुरस्काराने सन्मान होत असल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे.
राहीबाई यांनी दुर्मिळ होत जाणाऱ्या असंख्य देशी बियाण्यांचे जतन आणि संवर्धन त्यांनी केले आहे. पण हे काम करत असताना त्यांना बियाणे ठेवायला साधं घरही नव्हतं. अतिशय छोट्या आणि मातीच्या घरात त्यांना बियाणं ठेवावे लागत होते. त्यांची ही व्यथा ‘न्यूज18 लोकमत’ने पुढे आणली आणि अनेक मदतीसाठी अनेक हात पुढे आले आणि त्यातूनच उभी राहिली अस्सल देशी बियाण्यांची बँक.
‘न्यूज18 लोकमत’च्या सन्मान बळीराजाचा या पुरस्कार वितरण सोहळ्यात चंद्रकांत दादांनी राहीबाईंना सुसज्ज बिज बँक बांधून देण्याचे वचन दिले होते. आणि त्यांनी त्यांची वचनपूर्तीही त्यांनी केली.
अवघ्या 35 दिवसांत 3000 स्वेअर फुटाचे दगडी बांधकाम करण्यात आले आहे. या परिसराला साजेशी अशी अद्ययावत बीज बॅंक उभी राहिल्याने राहीबाई यांना आपले कर्तुत्व जगासमोर नेण्यासाठी आणखी गती मिळाली.