एटा, 9 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मिशन शक्ती’ अभियानाचं उत्कृष्ट उदाहरण एका डॉक्टर महिलेने समोर ठेवले आहे. पेशाने डॉक्टर असतानाही दिपालीने (Dr Deepali) प्रॅक्टिस सोडली आणि शेतीत प्रयोग सुरू केले. तिला बरीचं आव्हानं होती. मात्र बागायत नसलेल्या जमिनीवर स्ट्रॉबेरीची (Strawberry Farming) शेती करून पाहिली. आणि यात तिला यशही मिळालं. अवघ्या 1 हेक्टर शेतात तिने स्टॉबेरीची शेती केली आहे. गावात कोणीच हा प्रयोग केला नव्हता. त्यामुळे स्ट्रॉबेरीला जास्त मागणी आहे. डॉ. दिपाली आणि तिचे पती दिल्लीत डॉक्टर आहे. मात्र असं असतानाही त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. दिपाली महाराष्ट्रातील राहणारी आहे. येथे तिचे वडिलही स्ट्रॉबेरीची शेती करतात. तिने वडिलांकडून प्रेरणा घेतली. तिने विचार केला की स्ट्रॉबेरी जर महाराष्ट्रात होऊ शकते तर उत्तर प्रदेशात का नाही. तिचं म्हणणं आहे की, महाराष्ट्र व उत्तर प्रदेशातील वातावरण जवळपास सारखं आहे. यानंतर उत्तर प्रदेशातील जनपद एटामधील बावसा गावी एका जमिनीवर स्ट्रॉबेरीची शेती सुरू केली. हे ही वाचा- धक्कादायक! दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम केलं म्हणून विवाहितेला मिळाली तालिबानी शिक्षा वडील व सासऱ्यांचं सहकार्य डॉ. दिपाली म्हणते की, महाराष्ट्रातील कल्चर वेगळं आहे. तर उत्तर प्रदेशातील परिस्थिती वेगळी असली तरी माझे सासरे आणि पतीने सहकार्य केलं. ज्यामुळे हा निर्णय घ्यायला मला मदत झाली. ती म्हणाली की, एक हेक्टरमध्ये किमान 9 ते 10 लाखांपर्यंतचं उत्पन्न मिळवलं आहे. तिने आतापर्यंत 5 लाखांची स्ट्रॉबेरीची विक्री केली आहे. तिला विश्वास आहे की, दोन महिन्यांहून अधिक काळात तब्बल 18 ते 20 लाख रुपयांचं उत्पन्न होऊ शकतं. लॉकडाउनमध्ये शेती केली सुरू डॉ. दिपाली म्हणाली की, कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये ती गावी आली होती. त्यावेळी वडिलांकडून प्रेरणा घेऊन स्ट्रॉबेरीची शेती सुरू केली. यापूर्वी त्यांनी पहिले काही महिने यावर शोध घेतला. आता ती दिल्ली, आग्रा आणि कानपूरमध्ये स्ट्रॉबेरी विक्रीचं काम करते. सासऱ्यांनी सांगितलं की, डॉ. दिपालीचे सासरे कॉलेजात प्रिन्सिपल पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. ते आपल्या सूनेला मुलीप्रमाणेच वागवतात. एटा जिल्ह्यात जिथे मुलींना घराबाहेर जाऊन काम करण्याची परवानगी नसताना त्यांच्या कुटुंबाने काम करण्यासाठी पाठिंबा दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.