मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /तुमचीही होतेय चिडचिड? हे उपाय पाहा करून राग होईल गायब

तुमचीही होतेय चिडचिड? हे उपाय पाहा करून राग होईल गायब

ररोज आपण वाढत्या जबाबदाऱ्या आणि कामाच्या बोजामुळे ताण-तणावाचा सामना करत असतो. अशातच चिडचिडेपणा वाढतो. हे प्रमाण अधिक वाढणं हे कोणत्याही नात्यासाठी (Relation) चांगलं नसतं.

ररोज आपण वाढत्या जबाबदाऱ्या आणि कामाच्या बोजामुळे ताण-तणावाचा सामना करत असतो. अशातच चिडचिडेपणा वाढतो. हे प्रमाण अधिक वाढणं हे कोणत्याही नात्यासाठी (Relation) चांगलं नसतं.

ररोज आपण वाढत्या जबाबदाऱ्या आणि कामाच्या बोजामुळे ताण-तणावाचा सामना करत असतो. अशातच चिडचिडेपणा वाढतो. हे प्रमाण अधिक वाढणं हे कोणत्याही नात्यासाठी (Relation) चांगलं नसतं.

    मुंबई, 29 सप्टेंबर-  सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत (Lifestyle) आपल्याला अनेकदा ताण-तणावांचा (Stress) सामना करावा लागतो. दैनंदिन कामकाज, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, आजारपण, आर्थिक, सामाजिक प्रश्न आदींचा एक ताण (Pressure) आपल्या मनावर असतो. सातत्यानं ताण-तणावात राहणं हे शरीर आणि मनासाठी अपायकारक असतं. तणावामुळे शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तरुण वयातल्या अशा जीवनशैलीमुळे वृद्धापकाळात शारीरिक आणि मानसिक समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकतात. वाढत्या ताण-तणावामुळे स्वभावात चिडचिडेपणा अधिकच वाढताना दिसतो. चिडचिडेपणा किंवा सातत्यानं राग (Anger) आल्यानेही शारीरिक, मानसिक दुष्पपरिणाम होतात. दैनंदिन जीवनात चिडचिडेपणा किंवा राग कमी करण्यासाठी काही उपाय आहेत.

    दररोज आपण वाढत्या जबाबदाऱ्या आणि कामाच्या बोजामुळे ताण-तणावाचा सामना करत असतो. अशातच चिडचिडेपणा वाढतो. हे प्रमाण अधिक वाढणं हे कोणत्याही नात्यासाठी (Relation) चांगलं नसतं. कारण रागाच्या भरात तुमच्याकडून एखाद्याचं मन दुखावलं जाण्याची शक्यता असते. त्यामुळं चिडचिडेपणाच्या सवयीवर नियंत्रण ठेवणं फार आवश्यक असतं.

    (हे वाचा:chikoo : चिकूमुळे पचन आणि सुस्तीची समस्या राहते दूर; आणखी बरेच आहेत त्याचे फायदे)

    एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार,  सध्याच्या काळात अनेकांना राग, चिडचिडेपणाची समस्या भेडसावताना दिसते. यावर अनेकजण जाणीवपूर्वक उपाययोजना करताना दिसतात. तुम्हीदेखील या समस्येनं त्रस्त असाल, तर सर्वप्रथम तुमच्या या सवयीमुळे कोणाचं मन दुखावलं जाणार नाही ना, याची काळजी घ्या. या समस्येतून बाहेर येण्यासाठी दैनंदिन जीवनात सकारात्मक विचारसरणी (Positive Thinking) असलेल्या व्यक्तींच्या सातत्यानं संपर्कात राहा.अनेक जण आपल्या मनातल्या गोष्टी मनातच ठेवतात. त्यामुळे मनात असंतोषाची भावना वाढते. याच भावनेचं कालांतरानं चिडचिडेपणा किंवा रागात रूपांतर होतं. त्यामुळे अशी सवय असलेल्या व्यक्तींनी जास्तीत जास्त संवाद साधण्यावर भर द्यावा. कारण सातत्याने संवाद साधल्यामुळे मन हलकं होतं आणि चिडचिडेपणा कमी होतो.

    (हे वाचा:कॅन्सरपासून कित्येक आजारांवर गुणकारी आहेत अंबाडीच्या बिया; इतके सारे आहेत फायदे)

    तुम्हाला सातत्यानं राग येत असेल तर तुम्हाला मेडिटेशनची गरज आहे, असं समजावं आणि शक्य तितक्या लवकर मेडिटेशन (Meditation) सुरू करावं. मेडिटेशन केल्यानं अशांत मन शांत होतं आणि तुम्हाला राग नियंत्रणात ठेवणं शक्य होतं. जेव्हा एखाद्या प्रसंगी तुम्ही खूप रागावता तेव्हा 10पासून उलट आकडे मनातल्या मनात मोजावेत. यामुळे तुमचं लक्ष विचलित होऊन मन शांत होईल.एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला सातत्यानं राग येत असेल किंवा तुमची चिडचिड होत असेल, तर अशा वेळी दीर्घ श्वास घ्यावा. मनःशांतीसाठी एखादं सुंदर छायाचित्र किंवा निसर्गचित्र पाहावं. एखादं सुमधुर गाणं ऐकावं. या गोष्टी राग नियंत्रणासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतात. क्षणाचा राग किंवा चिडचिड हे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांचं मूळ असतं. त्यामुळं या उपायांच्या साह्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करावेत.

    First published:
    top videos

      Tags: Health Tips, Lifestyle