मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /chikoo : चिकूमुळे पचन आणि सुस्तीची समस्या राहते दूर; आणखी बरेच आहेत त्याचे फायदे

chikoo : चिकूमुळे पचन आणि सुस्तीची समस्या राहते दूर; आणखी बरेच आहेत त्याचे फायदे

रोजच्या आहारात ताज्या चिकूचा (chikoo) समावेश केल्यास अनेक फायदे मिळू शकतात. हे प्रोबायोटिक आहे. म्हणजेच ते खाल्ल्याने पोटात चांगल्या जीवाणूंची संख्या वाढते. तसेच, त्यात फायबर असते, जे पचन सुलभ करते.

रोजच्या आहारात ताज्या चिकूचा (chikoo) समावेश केल्यास अनेक फायदे मिळू शकतात. हे प्रोबायोटिक आहे. म्हणजेच ते खाल्ल्याने पोटात चांगल्या जीवाणूंची संख्या वाढते. तसेच, त्यात फायबर असते, जे पचन सुलभ करते.

रोजच्या आहारात ताज्या चिकूचा (chikoo) समावेश केल्यास अनेक फायदे मिळू शकतात. हे प्रोबायोटिक आहे. म्हणजेच ते खाल्ल्याने पोटात चांगल्या जीवाणूंची संख्या वाढते. तसेच, त्यात फायबर असते, जे पचन सुलभ करते.

नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : अलिकडील बैठ्या जीवनशैलीमुळे मानसिक आरोग्यावर (Mental Health) परिणाम होत आहे. दिवसभर बराच वेळ एकाच जागी खुर्चीवर बसून राहिल्याने पचनाशी संबंधित बहुतेक समस्या येतात. याशिवाय, एकाच ठिकाणी बराच वेळ बसून राहिल्याने हाडांवर आणि लैंगिक आरोग्यावरही परिणाम होतो. बराच काळ स्क्रीनसमोर काम करत राहिल्याने डोळ्यांना सर्वाधिक त्रास होतो. HT च्या बातमीनुसार, पोषणतज्ञ राजुता दिवेकर यांनी या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी काही खास पदार्थ घेण्याचा सल्ला दिला आहे. या खास पदार्थांमध्ये चिकूचा (chikoo or sapodilla helps in digestion) समावेश आहे. बैठ्या कामामुळं पचनाची समस्या सर्वात जास्त येते आणि चिकू ही समस्या सोपी करू शकतो.

चिकूचे (chikoo) गुणधर्म

चिकू हे बटाट्यासारखे दिसणारे फळ आहे, जे प्रत्येक हंगामात सहज उपलब्ध होते. चिकूला इतर अनेक नावांनीही ओळखले जाते. चिकूमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात.

रोजच्या आहारात ताज्या चिकूचा (chikoo) समावेश केल्यास अनेक फायदे मिळू शकतात. हे प्रोबायोटिक आहे. म्हणजेच ते खाल्ल्याने पोटात चांगल्या जीवाणूंची संख्या वाढते. तसेच, त्यात फायबर असते, जे पचन सुलभ करते. याशिवाय बद्धकोष्ठतेची समस्याही दूर करते.

हे वाचा - एकीकडे घटस्फोटित पती तर दुसरीकडे प्रियकर; अजब मागण्यांना कंटाळून महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

चिकूमध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंटमुळे ते शरीरात मुक्त रॅडिकल्स तयार होऊ देत नाही. अनेक रोग मुक्त रॅडिकल्समुळे होतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला खूप सुस्त वाटते किंवा वृद्धत्वाची चिन्हे शरीरावर दिसू लागतात, तेव्हा याचा अर्थ असा होतो की मुक्त रॅडिकल्स त्याला हानी पोहोचवत आहेत. मुक्त रॅडिकल्सपासून दूर राहण्यासाठी ताजी फळे आवश्यक आहेत. यासाठी चिकू हे परिपूर्ण फळ आहे.

बद्धकोष्ठता आणि अतिसार यासारख्या अनेक समस्या दूर करण्यासाठी चिकू उपयुक्त आहे. या व्यतिरिक्त, हे अतिसार, अशक्तपणा आणि हृदयरोगापासून देखील संरक्षण करू शकते. चिकूमुळे लघवीतील दाह कमी होऊ शकतो. चिकूशेक हे एनर्जी ड्रिंक म्हणूनही प्यायले जाऊ शकते कारण त्यात ग्लुकोज मोठ्या प्रमाणात आढळते.

हे वाचा - Shilpa Shetty नं आपल्या दोन्ही मुलांचा योगा करतानाचा व्हिडिओ केला शेअर, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल…

चिकूमध्ये कॅल्शियम आणि लोह असते, जे हाडे मजबूत करण्यासाठी आणि दृष्टीसाठी फायदेशीर मानले जाते. म्हणजेच, Work From Home दरम्यान बराच वेळ स्क्रीनसमोर राहिल्यामुळे डोळ्यांना त्रास होतो, त्यासाठी चिकूचे सेवन फायदेशीर ठरते.

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips