मराठी बातम्या /बातम्या /heatlh /कॅन्सरपासून कित्येक आजारांवर गुणकारी आहेत अंबाडीच्या बिया; इतके सारे आहेत फायदे

कॅन्सरपासून कित्येक आजारांवर गुणकारी आहेत अंबाडीच्या बिया; इतके सारे आहेत फायदे

अंबाडीच्या बिया (Flax seeds) केवळ लठ्ठपणावर नियंत्रणात ठेवत नाहीत तर अनेक रोगांवर उपयुक्त आहेत. ओमेगा 3 फॅटी अॅसिडचे प्रमाण यामध्ये मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्याचे नियमित सेवन हृदयरोग्यांसाठी खूप उपयुक्त आहे.

अंबाडीच्या बिया (Flax seeds) केवळ लठ्ठपणावर नियंत्रणात ठेवत नाहीत तर अनेक रोगांवर उपयुक्त आहेत. ओमेगा 3 फॅटी अॅसिडचे प्रमाण यामध्ये मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्याचे नियमित सेवन हृदयरोग्यांसाठी खूप उपयुक्त आहे.

अंबाडीच्या बिया (Flax seeds) केवळ लठ्ठपणावर नियंत्रणात ठेवत नाहीत तर अनेक रोगांवर उपयुक्त आहेत. ओमेगा 3 फॅटी अॅसिडचे प्रमाण यामध्ये मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्याचे नियमित सेवन हृदयरोग्यांसाठी खूप उपयुक्त आहे.

नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : भारतीय आयुर्वेदात अंबाडीच्या बिया (Flax seeds) शतकांपासून वापरल्या जात आहेत. आता त्याचं महत्त्व पाश्चिमात्य देशांमध्येही समजू लागलं आहे. हेल्थलाईनच्या बातमीनुसार, अंबाडीच्या बिया (Flax seeds) औषधी गुणांनी समृद्ध असतात. फ्लॅक्ससीड्समध्ये मुबलक पोषक घटक (Health Benefits of Flax seeds) आढळतात. हे प्रथिने, फायबर आणि ओमेगा -3 फॅटी अॅसिडमने समृद्ध आहे. याशिवाय फ्लेक्ससीडमध्ये प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, फोलेट आणि झेक्सॅन्थिन असतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत.

अंबाडीच्या बिया (Flax seeds) केवळ लठ्ठपणावर नियंत्रणात ठेवत नाहीत तर अनेक रोगांवर उपयुक्त आहेत. ओमेगा 3 फॅटी अॅसिडचे प्रमाण यामध्ये मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्याचे नियमित सेवन हृदयरोग्यांसाठी खूप उपयुक्त आहे. फ्लेक्ससीड बियाण्याचे फायदे संशोधनात सिद्ध झाले आहेत.

हृदयरोगापासून ठेवते दूर

अंबाडीचे बिया या ओमेगा 3 फॅटी अॅसिडचे उत्तम स्त्रोत आहेत. अल्फा-लिनोलेनिक अॅसिड (ALA) देखील त्यात आढळते. कोणत्याही एका अन्नातून एकाच वेळी दोन प्रकारचे फॅटी अॅसिड मिळणे कठीण आहे. अंबाडीच्या बियांमध्ये या दोन्ही गोष्टी असतात. ते कोलेस्टेरॉल कमी करतात आणि धमन्यांमध्ये सूज होऊ देत नाहीत. यामुळे कर्करोगाची गाठ वाढत नाही. कोस्टा रिकामध्ये 3,638 लोकांवर करण्यात आलेल्या चाचणीत असे दिसून आले की अंबाडीच्या बियांच्या नियमित सेवनाने हृदयविकाराचा धोका लक्षणीयरित्या कमी झाला.

हे वाचा - VIDEO: ह. भ. प. ताजुद्दीन महाराज यांचे निधन, कीर्तन सुरू असतानाच आला हृदयविकाराचा झटका

कर्करोगाचा धोका कमी करते

फ्लॅक्ससीड्समध्ये लिग्नन कंपाऊंड आढळतो. लिग्नन्स वनस्पतींमधून मिळवता येतात. त्यात अँटिऑक्सिडंट्स आणि इस्ट्रोजेन असतात. यामुळे कर्करोगाचा (Cancer) धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि आरोग्य चांगले राहते. लिग्नन वनस्पतीच्या अन्नापेक्षा फ्लेक्ससीडमध्ये 800 पट अधिक लिग्नान आहे. कॅनडामध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, फ्लेक्ससीडचे सेवन केल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका 18 टक्क्यांनी कमी होतो.

हे वाचा - 3 दिवसांनी नोकरीच्या ठिकाणी करावं लागणार का 12 तास काम, नवीन लेबर कोडबाबत काय आहे मोदी सरकारचा प्लॅन?

फ्लेक्ससीडचे नियमित सेवन केल्याने तुमचे पचन चांगले राहते. फ्लेक्ससीडमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असते, जे पचन शक्ती सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर करते.

सुरकुत्यापासून मुक्त व्हा

फ्लेक्ससीडमध्ये अँटीऑक्सिडंट आणि फायटोकेमिकल गुणधर्म असतात, जे वृद्धत्वामध्ये चेहऱ्यावरील सुरकुत्या काढून टाकतात, तसेच त्वचा तरुण आणि सुंदर बनवतात.

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips