करिअर घडवायचं असेल तर आधी करा 'ही' महत्त्वाची गोष्ट

करिअर घडवायचं असेल तर आधी करा 'ही' महत्त्वाची गोष्ट

कुठल्याही गोष्टीचा जर तुम्ही मनात न्यूनगंड बाळगून ठेवला तर प्रगती कशी होणार?

  • Share this:

मुंबई, 10 जून : आपण इतरांपेक्षा कमी पडतो अशी भावना जर सतत तुमच्या मनात असेल तर भवितव्य घडविण्यासाठी कुठलंही पाऊल तुम्ही धाडसाने आणि आत्मविश्वासाने उचलू शकत नाही. कुठल्याही गोष्टीचा जर तुम्ही मनात न्यूनगंड बाळगून ठेवला तर प्रगती होणार कशी? कोणतिही उत्तम संधी चालून आली तरीसुद्धा तुम्ही त्या संधीचं सोनं करू शकत नाही. त्यामुळे करिअर घडवायचं असेल तर आधी तुम्हाला मनातला न्यूनगंड बाहेर काढून टाकावा लागेल.

यशाचं शिखर सर करायचं असेल तर आत्मविश्वास हवाच; त्यासाठी लक्षात ठेवा 'या' 5 गोष्ट

सर्वात मोठा न्यूनगंड म्हणजे स्वतःला कमी लेखणं. आपण काही पुण्या-मुंबईचे नाही. लहान गावातून म्हणजे सोलापूर, सांगली, नगर, अमरावती अशा शहरातून काहीतरी करण्यासाठी पुण्यात किंवा मुंबईत गेलेली मुले आपण लहान गावातून आलो आहोत या कल्पनेनेच मागे राहतात.

मोठ्या शहरात राहणाऱ्यांच्या मराठी बोलण्यातही इंग्रजी शब्द जास्त असतात. ती भाषी ऐकून लहान शहरातून आलेले अनेकजण गोंधळून जातात. बोलण्यात अनेक इंग्रजी शब्द येणं हा बुद्धिमत्तेचा किंवा गुणवत्तेचा भाग नसून सरावाचा भाग असतो हे त्यांनी लक्षात घ्यावं. भाषेवरूनसुद्धा अनेकांना हिणवलं जातं. पण ही भाषासुद्धा गुणवत्तेचा निकष नाही. आकलनशक्ती, संवादकौशल्य, संघटनचातुर्य, कष्ट करण्याची तयारी ही खरी गुणवत्ता असते. या गोष्टी शहरात राहणाऱ्यांकडेच असतात असं नाही, तर प्रत्येकात त्या दडलेल्या असतात. अंतरात दडलेल्या आणि सुप्तावस्थेत असलेल्या या गोष्टींसाठी स्वतःलाच प्रयत्न करणं आवश्यक असतं.

माणसं ओळखायला नाही, तर समजायला शिका

एखाद्या गोष्टीची भीती वाटणं हासुद्धा एक प्रकारचा न्यूनगंडच आहे. भीतीसुद्धा प्रत्येकाची वेगवेगळी असते. एखाद्या व्यक्तीला ज्या गोष्टीची भीती वाटते, त्याची भीत दुसऱ्या व्यक्तीला वाटेलच असं होत नाही. त्यामुळे स्वतःवर फोकस करून आपल्यातल्या उणीवा शोधाव्या आणि त्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले तरच त्यातून काहीतरी साद्य होऊ शकतं.

First published: June 10, 2019, 3:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या