माणसं ओळखायला नाही, तर समजायला शिका

माणसं ओळखायला नाही, तर समजायला शिका

मनाचं खरं प्रतिबिंब चेहऱ्यावर उमटू न देता प्रत्येक जण खोटा मुखवटा धारण करून जगात वावरत असतो

  • Share this:

मुंबई, 8 जूऩ : ''मी माणसं ओळखायला शिकलो'' असं वाक्य अनेकजण वापरतात. परंतु माणसं ओळखायला नाही तर माणसं समजून घ्यायला शिकायला हवं. ते कसं हे आज आम्ही तुम्हाला सांगणा आहोत.

माणसांचा स्वभाव ओठात एक आणि पोटात एक असा असतो. तसंच काही माणसे ही फार हळवी असतात. त्यांच्या मनात एक असंत आणि वागण्यात मात्र वेगळंच. मनातून दुःखी असलेली व्यक्ती आपलं दुःख कोणाला कळू नेय म्हणून ते मनातच दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात.

मन आणि मेंदू शांत ठेवतात 'ही' योगासने

हसणाऱ्या सर्वच व्यक्ती मनातून सुखी, आनंदी असतीलच असं नाही. काही व्यक्तींना अगदी लहान सहान गोष्टींवरही रडायला येतं. अशी व्यक्ती मनाने फार स्वच्छ आणि हळवी असते.

काही व्यक्ती साध्या साध्या गोष्टींवरसुद्धा चिडतात, रागावतात. अशा व्यक्तींच्या वागण्यावर जाऊ नका, तर त्या व्यक्तीला समजून घ्या. कारण ती व्यक्ती मनातून फार एकटी आणि अस्वस्थ असू शकते. त्या व्यक्तीला प्रेमाची गरज असते, जे तिला कोणाकडूनही मिळालेलं नसतं. त्या व्यक्तीच्या अशा वागण्यामुळे तिला चुकीचं जज करू नका, तर त्यामागची अवस्था समजून घ्या.

'या' 5 कारणांमुळे नको असलेलं नातं जपण्यासाठी झटत राहतात महिला

माणूस जसा दिसतो तसा तो नसतो, प्रत्येक जण मनाचं खरं प्रतिबिंब चेहऱ्यावर उमटू न देता खोटा मुखवटा धारण करून जगात वावरत असतो. म्हणून माणसं ओळखण्यापेक्षा त्यांना समजून घेण आवश्यक असतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: men
First Published: Jun 8, 2019 11:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading