News18 Lokmat

यशाचं शिखर सर करायचं असेल तर आत्मविश्वास हवाच; त्यासाठी लक्षात ठेवा 'या' 5 गोष्टी

कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचं असेल महत्त्वाची ठरते तुमची इच्छाशक्ती

News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2019 07:53 PM IST

यशाचं शिखर सर करायचं असेल तर आत्मविश्वास हवाच; त्यासाठी लक्षात ठेवा 'या' 5 गोष्टी

मुंबई, 7 मे : जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आत्मविश्वास हा गुण सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. आत्मविश्वास हा एक असा गुण आहे जो प्रत्येकात कमी-अधीक प्रमाणात असतो. त्याची सद्याची पातळी वाढवली तर यशाचं शिखर सहज सर करता येतं.

राहणीमान - तुमच्या राहणीमानाचा परिणाम तुमच्या आत्मविश्वासावर होत असतो. तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करता त्यावर तुमचा आत्मविश्वास अवलंबून असतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा एखाद्या मुलाखतीसाठी जाता तेव्हा साजेशे कपडे तुम्ही परिधान करा. चांगलं दिसण्यानेसुद्धा तुम्ही लोकांना आकर्षिक करू शकता.

SSC RESULT 2019 : 10वीचा निकालाची तारीख अखेर जाहीर maharesult.nic.in इथे उद्या पाहा Result

सभोवतालची माणसं - तुमच्या आसपास अशी लोकं असतात त्यांना पाहून तुम्हाला लगेच वाटतं की ती व्यक्ती आत्मविश्वासाने पूर्ण आहे. अशी लोकं यशस्वी होण्यासाठी नेमकं कोणत्या गोष्टी करतात त्या गोष्टी तुमच्या दैनंदिन आयुष्यात समाविष्ट करा.

आवडत्या विषयात नैपुण्य मिळवा - प्रत्येकजण सगळ्या क्षेत्रात प्राविण्य मिळवू शकत नाही. मात्र, ज्यात नैपुण्य मिळवले जाऊ शकते, अशा आपल्या आवडीच्या दोन क्षेत्रात उत्तम प्रकारे प्रगती करू शकतात. त्यामुळे कोणत्याही एका क्षेत्रात नैपुण्य मिळविण्याचा प्रयत्न करा. आवडत्या विषयात नैपुण्य मिळविल्यास तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढतो. हे करण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो. पण न डगमगता तुम्ही वाटचाल करत राहिलात तर तुमचा आत्मविश्वास वाढतो.

Loading...

SSC RESULT 2019 : निकालाआधी घालमेल होतेय? 'या' टिप्स लक्षात ठेवल्या तर नाही जाणवणार तणाव

यशावर लक्ष केंद्रीत करा - अगदी शुल्लक असलं तरी भूतकाळात मिळवलेल्या यशावर तुमचा आत्वविश्वास अवलंबून असतो. जसे की तुम्ही वर्गात पहिले आलात, कोणत्याह विषयात शाळेत पहिला क्रमांक मिळवला अशा अनेक गोष्टी तुमचा आत्मविश्वास बुस्ट करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे अपयशावर लक्ष केंद्रीत न करता यशावर लक्ष केंद्रीत करा.

इच्छा तिथे मार्ग - कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचं असेल तुमची इच्छाशक्ती महत्त्वाची ठरते. इच्छाशक्तीमुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षाही प्रभावी आणि शक्तीशाली असते असं अल्बर्ट आइन्स्टाइनने म्हटलं आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढविण्यासाठी तुम्ही या शक्तीचा पुरेपूर वापर करा.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 07:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...