National Kiss Day: 'किस' विषयी या 7 भन्नाट गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? चेहऱ्यावर आणतील हसू

किसमुळे सिफलिस नावाचा त्रास होतो.

जून हा दिवस अमेरिकेत नॅशनल किसिंग डे (National Kissing Day) म्हणून साजरा केला जातो.

  • Share this:
 मुंबई, 22-  22 जून हा दिवस अमेरिकेत नॅशनल किसिंग डे (National Kissing Day) म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने किसिंग संदर्भातील या 7 गोष्टी तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला नेहमीच आनंद देऊ शकतात. काय आहेत या गोष्टी जाणून घेऊया... किस किंवा चुंबन (Kiss) ही तुमच्या जोडीदाराप्रती तुमचं असणारं प्रेम (Love) व्यक्त करण्याची कृती. हे संवादाचे एक सुंदर माध्यम आहे. किसिंग ही केवळ उत्तम शारीरिक क्रिया नसून ती मानसिक आरोग्य (Mental Health) देखील उत्तम ठेवते. किसिंगमुळे तणाव कमी होतं. तसेच कॅलरीज कमी (Calories Burn) होऊन रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. कोणत्याही नात्यात चुंबनाव्दारे प्रेमाची किंवा काळजीची अभिव्यक्ती प्रेमभावना दुप्पट करते. किसिंगमुळे नातं अधिक सुदृढ होतं. त्यामुळे युनायटेड स्टेटसमध्ये (United states) दरवर्षी 22 जूनला नॅशनल किसिंग डे साजरा केला जातो. आता हा दिवस केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये साजरा केला जात आहे. परंतु, 22 जूनलाच हा दिवस का साजरा होतो याला ठोस असा काही संदर्भ नाही. मात्र असं मानलं जातं की किसिंग डे सेलिब्रेशन सर्वप्रथम युनायटेड किंगडममध्ये (United Kingdom) सुरु झालं, नंतर हळूहळू हा विशेष दिवस अन्य देशांमध्ये साजरा केला जाऊ लागला.  साधारणतः 2000 च्या दशकाच्या सुरुवातीपासून किसिंग डे साजरा करण्याची प्रथा सुरु झाली. तसेच इंटरनॅशनल किसिंग डे (International Kissing Day) 6 जुलैला साजरा केला जातो. (हे वाचा: अरेच्चा! इथं कपल एकमेकांना I Love You म्हणत नाही; मग प्रेम व्यक्त करतात कसे?  ) आज 22 जूनला नॅशनल किसिंग डे साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर तुमच्या जोडीदाराच्या चेहऱ्यावरील हास्य अधिक खुलवायचे असेल तर किसिंगच्या या 7 गोष्टींची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. 1) तुम्ही जर मिनिट भरासाठी तुमच्या पार्टनरला किस केला तर तुमच्या शरीरातील 26 कॅलरीज बर्न होतात. जर तुम्ही ही कृती सातत्याने केली तर तुमचे आयुष्य वाढते. 2) किसिंगमुळे तुमच्या तोंडात अतिरिक्त लाळेची (Saliva) निर्मिती होते. यामुळे तुमचं तोंड स्वच्छ होतं तसंच दातांचं आरोग्य देखील सुधारतं. 3) सरासरी, लोक आपल्या आयुष्यातील जवळपास दोन आठवडे म्हणजेच 336 तास किसिंग या क्रियेसाठी घालवतात. 4) मध्ययुगीन काळात जेव्हा शिक्षणाचा अभाव होता, तेव्हा लोक चुंबनाच्या माध्यमातून प्रामाणिक भावना व्यक्त करण्यासाठी X या चिन्हाचा वापर करत. (हे वाचा:फक्त गोवा, शिमला नाही; तर Honeymoon साठी उत्तम आहेत भारतातील ही 10 स्थळं   ) 5) 1966 मध्ये प्रथमच भिन्नलिंगी चुंबनाचे दृष्य टेलिव्हिजनवरील (Television) स्टार ट्रेक या मालिकेच्या (Serial)  एपिसोडसाठी चित्रित करण्यात आले. 6) लॅटिन अमेरिकेत (Latin America) एखादी व्यक्ती भेटली तर त्यास ग्रीट (Greet) करण्यासाठी किस घेण्याची प्रथा आहे. फ्रान्समध्ये (France) उत्कंठा व्यक्त करण्यासाठी किस घेण्याची प्रथा आहे तर दक्षिण अफ्रिकेत (South Africa) मोठ्या व्यक्ती जमिनीवर चालतात म्हणून भूमीला किस करण्याची प्रथा आहे. इटलीमध्ये (Italy) नमस्कार म्हणण्यासाठी किस करण्याची प्रथा आहे. 7) 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या इलेना अनडन या चित्रपटात अभिनेत्री नेकर झॅडेगानंद आणि ट्रासी दिनवीडी यांनी 3 मिनिटे 23 सेकंदापर्यंत किस घेत विक्रम नोंदवला. दुसरीकडे वास्तविक जीवनात प्रदीर्घ चुंबनाचा विश्वविक्रम एककाचाई आणि लक्साना तिरानारट या थाई (Thai) दांपत्याच्या नावावर नोंदवला गेला. या दांपत्याने एकमेकांना तब्बल 58 तास,35 मिनिटे आणि 58 सेकंदापर्यंत किस केलं होतं. या गोष्टी पाहता किस ही कृती आपल्या जीवनासाठी किती महत्वाची आहे स्पष्ट होतं. त्यामुळे नॅशनल किसिंग डे हा आपल्या प्रेमाची आठवण आणि किसिंगचे फायदे अधोरेखित करणारा ठरतो.
Published by:Aiman Desai
First published: