लंडन, 28 जानेवारी : किती तरी असे आहेत ज्यांना साधी लग्नासाठी एक मुलगी सापडत नाही. एका मुलीचा होकार मिळवता मिळवताच नाकी नऊ येतात. त्यासाठीही कितीतरी पापड बेलावे लागतात. पण या तरुणाने मात्र लाइफ पार्टनर शोधण्यासाठी असा अजब फंडा आजमवाला की त्यामुळे कमालच झाली. त्याच्याशी लग्न करण्यासाठी तरुणींची रांगच लागली. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तब्बल 5000 तरुणींनी त्याला लग्नासाठी विचारणा केली (Finding life partner). ब्रिटनमध्ये राहणारा 29 वर्षांचा मोहम्मद मलिक (Muhammad Malik). ज्याला अरेंज मॅरेज करायचं नव्हतं. त्यामुळे त्याने आपल्या जोडीदाराचा अनोख्या पद्धतीने शोध सुरू केला. त्यानंतर तब्बल 5 हजारपेक्षा जास्त तरुणींनी त्यांच्याशी लग्नासाठी संपर्क केला. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार मोहम्मदने लंडन, बर्मिंघमसह अनेक ठिकाणी मला अरेंज मॅरेजपासून वाचवा असा लग्नाचा अनोखा बोर्ड लावला होता. आपल्याला लग्न करायचं आहे. लग्नासाठी मुलगी शोधत आहोत, अशी जाहिरात त्याने दिली. मोहम्मदने जाहिरातीत आपला फोटोही लावला होता. #FindMalikAWife हॅशटॅगही सोशल मीडियावर ट्रेंड झाला होता.
इतकंच नव्हे तर त्याने findMALIKswife.com वेबसाईटही बनवली होती. मोहम्मद मलिकने ट्विटरवर सांगितलं की लोक त्याला मुस्लिम डेटिंग अॅप Muzmatch वर सर्च करत आहेत. हे वाचा - नाव मोठं लक्षण खोटं! 5 Star Hotel मधील Dirty Secrets; धक्कादायक वास्तव उघड पण आता मोहम्मदने एका डेटिंग अॅपसाठी हे स्टंट केल्याचा दावा लोकांनी केला आहे. आज तकने डेली मेलच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसरा रिपोर्टनुसार मोहम्मदच्या findMALIKswife.com या वेबसाईटवर गेल्यावर आता findmalik on muzmatch असं पाहायला मिळतं. तसंच muzmatch वेबसाईटची टॅगलाईनही दिसते.
secrets out 👀 find me on @muzmatch! #findmalikawife https://t.co/UCBcu4oU6o
— Muhammad Malik (@findingmuhammad) January 14, 2022
ब्रिटनमध्ये आता काही नवे बिलबोर्ड लावण्यात आले आहेत. ज्यात मोहम्मदच मुजमॅचचं प्रोफाईल दाखवण्यात आलं आहे. मोहम्मदने सिक्रेट्स आऊट अशा आशयाचं ट्विटही केलं आहे.
मोहम्मदचं लग्न झालं असून #FindMalikAWife हे कॅम्पेन खोटं आहे. असं काही लोकांनी म्हटलं आहे. ज्या व्हिडीओ कॅम्पेनमध्ये तो दिसत आहेत, त्यात त्याच्या शेजारी महिलाही बसलेली दिसत आहे. त्यामुळे मलिककचं लग्न झालं असून त्याचा केवळ या अॅडमध्ये वापर केला जात असल्याचं काही लोक म्हणत आहेत. हे वाचा - गर्लफ्रेंडच्या घरी बसून केलेल्या त्या कामानं पालटलं नशीब; तरुणाने कमावले 10 अब्ज यानंतर मोहम्मद खरंच सिंगल आहे का? असा प्रश्न युझर्सना पडला आहे. दरम्यान हे कॅम्पेन खरं आहे. मोहम्मद मुजमॅचचा कर्मचारी नाही. तो खरंच जोडीदाराच्या शोधात आहे, असं शहजाद युनिस यांनी स्पष्ट केलं आहे.