Home /News /lifestyle /

भारतात 4 वर्षात बिबट्यांची संख्या 12000 वर; महाराष्ट्रात किती बिबटे पाहा

भारतात 4 वर्षात बिबट्यांची संख्या 12000 वर; महाराष्ट्रात किती बिबटे पाहा

2014 च्या तुलनेत 2018 मध्ये बिबट्यांची (LEOPARD) संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

नवी दिल्ली, 22 डिसेंबर : देशभरात विविध ठिकाणी आणि विशेषतः महाराष्ट्रात बिबट्या (Leopard) आणि मानवांची झडप होताना दिसून येत आहे. यामध्ये मागील काही दिवसांत अनेक बिबट्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण नुकतीच समोर आलेली ही माहिती वन्यजीवांच्या संगोपनाच्या (Wild Life Conservation) दृष्टीने खूपच दिलासादायक आहे. 2014 च्या तुलनेत बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील बिबट्यांची संख्या वाढल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar ) यांनी दिली आहे. 'भारतातील 2018 मधील बिबट्यांची स्थिती'( Status of Leopard in India 2018 ) या विषयावरील अहवाल जावडेकर यांनी प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार  2014 ते 2018 या चार वर्षांत बिबट्यांची संख्या 8 हजारांवरून 12 हजारांवर गेली आहे. 2014 मध्ये देशात बिबट्यांची संख्या 8 हजार होती. ती 2018 मध्ये वाढून 12 हजार इतकी झाली. म्हणजेच मागील चार वर्षात बिबट्यांची संख्या 4 हजाराने वाढली. हे वाचा - निसर्गाची किमया : समुद्रातील या प्राण्यांनाही सरड्याप्रमाणे बदलता येतो रंग बिबट्यांची ही मोजणी कॅमेरा ट्रॅपिंगच्या(Camera Trapping) माध्यमातून करण्यात आल्याची माहिती जावडेकर यांनी दिली. यामुळे भारत आपलं पर्यावरण, पर्यावरणीय स्थिती आणि जैवविविधतेचं संरक्षण किती उत्तम प्रकारे करतो, हे यातून सिद्ध होत असं जावडेकर म्हणाले.  बिबट्याबरोबरच देशात वाघ आणि सिंहाची संख्या वाढली आहे. कोणत्या राज्यात किती बिबटे?  12 हजार बिबट्यांपैकी मध्य प्रदेशात सर्वाधिक बिबटे आढळून आले आहेत. मध्य प्रदेशात 3421 बिबटे आढळून आले आहेत. तर देशभरातील इतर राज्यांपैकी महाराष्ट्रात 1690, कर्नाटकमध्ये 1783 इतके बिबटे आढळून आले आहेत. हे वाचा - हत्तीमागे लपून वाघ शोधतोय सावज, असा VIDEO तुम्ही कधीही पाहिला नसेल विभागवार संख्या मोजायची झाल्यास  मध्य भारत आणि पूर्व घाटात बिबट्यांची संख्या सर्वाधिक आहे. या भागात 8071 इतके बिबटे आढळून आले आहेत. ईशान्य डोंगराळ प्रदेशात फक्त 141 बिबटे आढळले आहेत.मध्य भारत आणि पूर्व घाटामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा समावेश होतो. पश्चिम घाट क्षेत्रात 3387 बिबटे आढळले आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि बिहार व्यापलेल्या शिवालिक टेकड्या आणि गंगेच्या मैदानामध्ये 1253 बिबटे आढळून आले आहेत. तर पश्चिमेकडील कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि केरळ या राज्यांमध्ये 3387 बिबटे आढळले आहेत.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Environment, Prakash javadekar, Wild animal

पुढील बातम्या