जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हत्तीमागे लपून वाघ शोधतोय सावज, असा VIDEO तुम्ही कधीही पाहिला नसेल

हत्तीमागे लपून वाघ शोधतोय सावज, असा VIDEO तुम्ही कधीही पाहिला नसेल

हत्तीमागे लपून वाघ शोधतोय सावज, असा VIDEO तुम्ही कधीही पाहिला नसेल

शिकारीच्या शोधात असलेला वाघ आणि हत्ती एकाच फ्रेममध्ये दिसले आहेत. काळजाचा ठोक चुकवणारा हा VIDEO पाहा

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 डिसेंबर : जंगली प्राण्यांच्या लढाईचे तर कधी मजा करत असल्याचे अनेक खोडकर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात पण सध्या एका व्हिडीओची चर्चा रंगली आहे. हा व्हिडीओ महिंद्रा ग्रूपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की पर्यटक हत्तीचे फोटो काढण्यात मशगूल आहेत. तर हत्तीमागे असलेल्या झुडुपातून वाघ डोकावून पाहात आहे. शिकारीच्या शोधात सावज पकडण्यासाठी वाघ झुडुपात दडून बसला आहे. हत्तींच्या पायामुळे त्याच्याकडे कोणाचं विशेष लक्ष जात नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जाहिरात

हे वाचा- बँडबाजा नाही, पाहुणचार नाही; अवघ्या 17 मिनिटांत पार पडली 3 लग्न आनंद महिंद्रा यांनी विलियम ब्लॅक यांच्या कवितेचा कॅप्शनमध्ये उल्लेख करत हा व्हिडीओ 19 डिसेंबर रोजी शेअर केला आहे. हा व्हिडीओ नागरहोल अभयारण्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 40 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. वाघाच्या डोक्यात कधी काय येईल सांगता येत नाही अशी कमेंट एका युझऱनं केली आहे. तर दुसऱ्या युझरनं वाघ आणि हत्ती एकाच फ्रेममध्ये अशापद्धतीनं दुर्मीळ पाहायला मिळतात असं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात