सीहॉर्स (Seahorse) म्हणजे पाणघोडा देखील रंग बदलण्यात तरबेज असून कोणत्याही संकटाच्या प्रसंगी तो रंग बदलतो. आपल्या भावना व्यक्त करताना देखील तो रंग बदलतो. त्याच्या शरीरात असणाऱ्या क्रोमेटोफोर्स (chromatophores) मूळ वेगाने रंग बदलण्यास मदत होते. अनेकदा शारीरिक संबंध ठेवताना देखील तो हळूहळू रंग बदलत असतो. सांकेतिक फोटो (pixabay)
प्रशांत महासागरात आढळणाऱ्या मिमिक ऑक्टोपस (Mimic octopus) या समुद्री जीवाला अतिशय हुशार समजलं जातं. अतिशय लवचिक त्वचेमुळं रंग बदलण्यास मदत होते. त्याचबरोबर आकार देखील बदलण्यास मदत होते. कोणत्याही वातावरणात हा प्राणी रंग बदलू शकतो. त्यामुळे त्याला अतिशय हुशार समुद्री जीव म्हटलं जातं. सांकेतिक फोटो (pixabay)
पॅसिफिक ट्री फ्रॉग(Pacific tree frog) हा देखील रंग बदलण्यात तरबेज आहे. आपल्या आजूबाजूला संकट आहे असं दिसल्यास हा बेडूक रंग बदलतो. उत्तर अमेरिकेत आढळणारा हा बेडूक आसपासच्या वातावरणाप्रमाणे रंग बदलण्यास सक्षम आहे. आपल्या चिकट पायांमुळे त्याला एका झाडावरून दुसऱ्या ठिकाणी आणि इतर गोष्टींवर जाण्यास मदत होते. सांकेतिक फोटो (pxhere)