जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / जबड्यात धरून पाण्याबाहेर काढलं, काही क्षणात बिबट्यानं मगरीला केलं खल्लास; थरारक VIDEO

जबड्यात धरून पाण्याबाहेर काढलं, काही क्षणात बिबट्यानं मगरीला केलं खल्लास; थरारक VIDEO

जबड्यात धरून पाण्याबाहेर काढलं, काही क्षणात बिबट्यानं मगरीला केलं खल्लास; थरारक VIDEO

नदीत पोहत असलेल्या मगरीवर (crocodile) बिबट्या (leopard) हल्ला करतो आणि मगर-बिबट्याची कशी झुंज लागते ते तुम्हीच पाहा.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 06 जानेवारी :  मगर (Crocodile) हा असा हिंस्त्र प्राणी आहे की जो एखाद्या जिवंत प्राण्याला सहजपणे गिळून टाकू शकतो. तसंच बिबट्या (Leopard) हा देखील असा प्राणी आहे की जो झडप घालताच शिकारीला गतप्राण करून टाकतो. असे हे दोन्ही प्राणी एकमेकांसमोर आले आणि त्यांनी एकमेकांशी पंगा घेतला तर काय? असाच एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल (social media viral) होतो आहे. या व्हिडीओत मगर आणि बिबट्या हे दोन्ही हिंस्त्र प्राणी समोरासमोर ठाकल्याचं दिसून येतात. बिबट्या मगरीची शिकार करत असतानाचा प्रसंग या व्हिडीओमध्ये कैद झाला आहे.

जाहिरात

व्हिडीओमध्ये एका नदीत मगर निवांतपणे पोहत आहे. याचवेळी नदीजवळील उंचभागावर बसलेल्या एका बिबट्याची नजर या मगरीवर पडते आणि तो क्षणाचाही विलंब न लावता त्या मगरीवर झडप घेतो आणि त्या मगरीला आपल्या जबड्यात घट्ट पकडतो. जेव्हा बिबट्या मगरीची शिकार करतो, तेव्हा मगर तडफडू लागते. पण बिबट्याच्या तावडीतून ती सुटू शकत नाही. नंतर बिबट्या मगरीला पाण्यातून बाहेर घेऊन जातो, आणि जंगलात नेऊन मगरीला खाऊन टाकतो, असं दृश्य या व्हिडीओत दिसतं. हे वाचा -  शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ! हरणापुढे ‘जंगल का राजा’ही फेल! शिकारीचा VIDEO VIRAL साकेत नावाच्या एका युझरने हा व्हिडीओ प्रथम आपल्या ट्विटर अकाऊंटवरून (Twitter Account) शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना साकेत लिहितात, “जंगलात खेळ सुरू आहे, यावेळी बिबट्याच्या विरोधात मगर उभी ठाकली आहे” हा व्हिडीओ साकेत यांनी शनिवारी शेअर करताच तो वेगाने व्हायरल झाला. अंगावर काटा आणणाऱ्या या व्हिडीओला भरपूर लाईक्स मिळत आहेत आणि त्यावर बऱ्याच प्रतिक्रियाही येत आहेत. हे वाचा -  VIDEO - …आणि गुरगुरणारा सिंह गप्प बसला; जंगलाचा राजा पाण्यात भित्री मांजर झाला वन्यजीवांवर आधारित विविध चॅनेल्स वन्यप्राण्यांची (Wild Animal) जीवनशैली, शिकार करण्याच्या पद्धती आदींबाबत माहितीपर व्हिडीओ सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून देखील शेअर करत असतात. या व्हिडीओला अभ्यासक, वन्यप्राणी प्रेमींकडून विशेष पसंती मिळत असते. असे व्हिडीओ सोशल मिडीयावर चर्चेचे किंवा ट्रेडिंगचे ठरतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात