VIDEO - ...आणि गुरगुरणारा सिंह गप्प बसला; जंगलाच्या राजाची पाण्यात झाली भित्र्या मांजरीसारखी अवस्था

VIDEO - ...आणि गुरगुरणारा सिंह गप्प बसला; जंगलाच्या राजाची पाण्यात झाली भित्र्या मांजरीसारखी अवस्था

पाण्यात नेमकं असं झालं तरी काय ज्यामुळे जंगलाचा राजा असूनही सिंहाचे (lion) काहीच चालले नाही?

  • Share this:

मुंबई, 14 डिसेंबर : द लायन (lion)... द किंग... जंगलाचा राजा... ज्याला पाहून किंबहुना त्याची फक्त डरकाळी ऐकून संपूर्ण जंगलातील सर्व प्राणी कसे थरथर कापतात हे आपण सर्वांनी गोष्टींमध्ये ऐकलंच आहे. पण या जंगल का राजा शेरची हुकूमत फक्त जंगलापूर्तीच. जेव्हा हा राजा पाण्यात उतरतो तेव्हा तिथं त्याचा राज चालत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे.

आयएफएस ऑफिसर प्रवीण अंगुसामी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एरवी गुरगुरनारा सिंह लगेचच शांत झाला आहे.

व्हिडिओमध्ये पाहू शकता सिंहाचा कळप नदीत आहे. बछडे, मादी आणि नर सिंह यामध्ये आहेत. त्यांनी बहुतेक नदीकाठावरच एका मोठ्या प्राण्याची शिकार केली आहे आणि सर्वजण एकत्र खात आहेत.

इतक्यात तिथून एक मगर येते. तिला पाहून सर्व सिंह आवाज करू लागतात. मग त्या मगरीला हुसकावून लावण्यासाठी आणि आपल्या कळपाच्या संरक्षणासाठी त्यांचा राजा उठतो आणि मगरीसमोर येऊन उभा राहतो. मगरीला दूर करण्याचा, तिला घाबरवण्याचा, पळवून लावण्याचा तो प्रयत्न करतो.

हे वाचा - OMG! विषारी सापाला या पक्षाने एका दमात गिळलं; Video पाहून अंगावर काटा उभा राहिल

पण मगर ती मगर. ती थोडी कोणाला घाबरते आहे. सिंहाने थोडा आवाज काढून तिचा रस्ता रोखताच पाण्याच्या आत असलेली ती थोडीशी पाण्याच्या वर आली आणि मग काय मोठी छाती करून तिच्यासमोर उभा राहिलेला सिंहाचा आवाज बंद. तो गप्पपणे मगरीच्या रस्त्यातून बाजूला झाला आणि तिला तिची नदीतील वाट मोकळी करून दिली. मगरदेखील सिंहाच्या कळपातील कोणालाच काही न करता शांतपणे पुढे निघून गेली.

एकंदर दृश्य पाहता जणू या मगरीने माझा रस्ता सोड नाहीतर मोठे परिणाम भोगावे लागतील अशी जणू धमकीच दिली. त्यामुळे सिंह घाबरून बाजूला झाला.

हे वाचा -  फ्लॅट पाहण्यासाठी गेला, किचनचा दरवाजा उघडला आणि बसला शॉक; असं काय होतं तिथं पाहा VIDEO

जंगलात आपला राज चालत असला तरी नदीत चालणार नाही हे त्यालाही चांगलंच समजलं. त्यामुळे नदीत असताना तिथं मगरीशी पंगा न घेण्यातच आपलं भलं आहे हे त्याने ओळखलं.

Published by: Priya Lad
First published: December 14, 2020, 8:00 AM IST

ताज्या बातम्या