अरे हे काय? मृतावस्थेत असलेलं हरण चक्क पळू लागलं; शिकारीचा VIDEO होतोय व्हायरल

अरे हे काय? मृतावस्थेत असलेलं हरण चक्क पळू लागलं; शिकारीचा VIDEO होतोय व्हायरल

बिबट्या (leopard) आणि तरस (Hyenas) असे दोन हिंस्र प्राणी हरणाची (Deer) शिकार करायला आले पण...

  • Share this:

मुंबई, 19 मार्च : हिंस्र प्राण्यांच्या (animal video) तावडीत एकदा का कोणता दुसरा प्राणी सापडला तर त्याची सुटका होणं अशक्यच. पण एक हरण (deer) एका नाही तर दोन हिंस्र प्राण्यांच्या तावडीत सापडला. पण या शिकारी प्राण्यांसमोरच मृतावस्थेत असलेला हा हरण पळू लागला. सोशल मीडियावर (social media) या हरणाच्या शिकारीचा व्हिडीओ व्हायरल (viral video) होतो आहे.

एका हरणाची शिकार करण्यासाठी सर्वात आधी बिबट्या आला. त्यानंतर तो बिबट्या हरणाला सोडून निघून गेला आणि तिथं आला तो तरस. हरणाला खाण्यासाठी तरसाने बिबट्यालाही पळवण्याचा प्रयत्न केला. पण ना बिबट्या... ना तरस... हरण कुणालाचा सापडलं नाही. अगदी या दोघांच्याही तोंडाशी हरण असताना ते त्यांच्या तावडीतून निसटलं, कसं ते तुम्हीच व्हिडीओत पाहा.

व्हिडीओत पाहू शकता, एक हरण जमिनीवर निपचित पडलं आहे, सुरुवातीला बिबट्या त्याच्या जवळ असतो. पण कदाचित हरण आधीपासून मृत आहे, असं समजून तो तिथून निघून जातो. त्याचवेळी तिथं तरस येतो आणि तो हरणाजवळ जातो. हरणाला तो आपल्या तोंडाने ओढतानाही दिसतो. पण आपली शिकार बिबट्या पळवेल असं वाटतं म्हणून तरस बिबट्याला पळवण्याच्या प्रयत्नात हरणापासून किंचित दूर जातो. त्याचवेळी मृतावस्थेत असलेलं हरण चक्क उठून पळू लागतं.

हे वाचा - बारा वर्षांनंतर हत्तीला दिसले आपला जीव वाचवणारे डॉक्टर, दिली अनोखी सलामी

हरणाला पळताना पाहून त्याची शिकार करण्यासाठी आलेले बिबट्या आणि तरसही हैराण होतात. तरस तर त्याच्या मागे धावतच सुटतो. खरंतर हे हरण मृत नव्हतं तर आपण मृत असल्याचं नाटक करत होतं, जेणेकरून कुणी त्याची शिकार करणार नाही. हरणाने वेळीच डोकं लढवलं म्हणून त्याचा जीव वाचला. दोन दोन हिंस्र प्राणी त्याची शिकार करायला आले, पण दोघांपैकी एकाच्याही तावडीत हे हुशार हरण सापडलं नाही. त्याच्या हुशारीमुळे त्याची शिकार करायला आलेला बिबट्या आणि तरस दोघंही उपाशीच राहिले. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणतात ना. तसंच शक्तीचा वापर न करता युक्ती वापरून हरणाना बाजी मारली आहे.

हे वाचा - आईबाबाच्या लग्नात चिमुकल्या लेकीचा 'ड्रामा'; VIDEO पाहून पोट धरून हसाल

आयएफएस ऑफिसर सुशांत नंदा यांनी आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ऑस्कर परफॉर्मन्स असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी हरणाच्या हुश्शारीला दाद दिली.

Published by: Priya Lad
First published: March 19, 2021, 11:41 AM IST

ताज्या बातम्या