Home /News /lifestyle /

आईबाबाच्या लग्नात चिमुकल्या लेकीचा 'ड्रामा'; VIDEO पाहून पोट धरून हसाल

आईबाबाच्या लग्नात चिमुकल्या लेकीचा 'ड्रामा'; VIDEO पाहून पोट धरून हसाल

चिमुरडीने आपल्या आईबाबांच लग्न चांगलंच गाजवलं.

  मुंबई, 18 मार्च :  लहान मुलांच्या बाबतीत तुम्ही एक गोष्ट नक्कीच पाहिली असेल. काही मुलांना आपली आई-वडील एकमेकांजवळ आलेले अजिबात आवडत नाही. म्हणजे आपल्याला सोडून जर आई बाबांवर किंवा बाबा आईवर आपलं प्रेम व्यक्त करताना दिसले तर मुलं रडतातही. असाच काहीसा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) होतो आहेत. ज्याच एका चिमुकलीसमोर तिचे आई-वडील लग्न (Girl crying in Mother father marriage ceremony) करत आहेत. मग काय या चिमुरडीने हे लग्न चांगलंच गाजवलं. आपल्या आई-बाबांच्या लग्नात लेकीनं चांगलाच ड्रामा केला आहे. आई-वडील स्टेजवर होते आणि चिमुकली स्टेजच्या खाली. तिला आपले आईबाबा स्टेजवर एकत्र दिसले आणि मग तिनं काय केलं हे तुम्ही व्हिडीओतच पाहा.
  View this post on Instagram

  A post shared by Sara Wickman (@saradiane_)

  चिमुकली जमिनीवर अक्षरश: लोळण घेते आणि ढसाढसा रडते. मध्येच ती आपलं डोकं वर करूनदेखील पाहते पण सर्व हसताना दिसतात आणि मग ती पुन्हा आपलं डोकं जमिनीवर ठेवून रडू लागते. आपल्याला एकटं सोडून आईबाबा लग्न करत आहेत, हे कदाचित या चिमुकलीला आवडलं नसावं आणि म्हणूनच तिनं हॉलमध्येच भोंगा पसरला. तिला पाहून लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांनाही हसू आवरलं नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही पोट दुखेपर्यंत हसू आलं असेल. हे वाचा - चिमुरड्यांच्या झोपाळ्यावर झुलता झुलता हवेत उंच गेले आजोबा आणि...; VIDEO VIRAL व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, ही खरी कहाणी आहे. आमच्या मुलीने आमच्या लग्नात रडूरडून हंगामा केला. आम्हाला हे बिलकुल नको होतं. व्हिडीओच्या शेवटी पाहू शकता, तिची आई तिला आपल्या कुशीत घेते. आपल्या आईच्या कुशीत ती शांतपणे राहते आणि तिचं रडणंही बंद होतं.
  View this post on Instagram

  A post shared by Sara Wickman (@saradiane_)

  सारानं आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात मुलगी नवरीच्या हातातच आहे आणि नवरा तिला अंगठी घालत असतो. त्याचवेळी नवऱ्याच्या हातातून अंगठी पडते आणि मग सर्व जण जोरजोरात हसतात. पण चिमुकली आपल्या आईला बिलगुनच आहे. ती तिला अजिबात सोडत नाही.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Funny video, Viral, Viral videos

  पुढील बातम्या