जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / World Water Day 2022: म्हणून पुरेसं पाणी पिण्याची आपल्या आरोग्याला आहे गरज; अनेक आजार दूर राहतात

World Water Day 2022: म्हणून पुरेसं पाणी पिण्याची आपल्या आरोग्याला आहे गरज; अनेक आजार दूर राहतात

World Water Day 2022: म्हणून पुरेसं पाणी पिण्याची आपल्या आरोग्याला आहे गरज; अनेक आजार दूर राहतात

पाण्यामुळं शरीरातील अनेक अवयवांचं कार्य सुरळीत राहण्यासाठी मदत होते. म्हणूनच निरोगी शरीरासाठी पुरेसं पाणी पिणं अतिशय महत्त्वाचं समजल जातं. कडाक्याच्या उन्हात जास्त घाम येत असल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 मार्च : आज ‘जागतिक जल दिन’ (22 मार्च) आहे. जगण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे. मानवी शरीराचा सुमारे 60 टक्के भाग पाण्याने बनलेला असला, तरी शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी, विषारी घटक काढून टाकण्यासोबतच पाणी पिण्याचे इतरही अनेक फायदे (Benefits of water) आहेत. पाण्यामुळं शरीरातील अनेक अवयवांचं कार्य सुरळीत राहण्यासाठी मदत होते. म्हणूनच निरोगी शरीरासाठी पुरेसं पाणी पिणं अतिशय महत्त्वाचं समजल जातं. कडाक्याच्या उन्हात जास्त घाम येत असल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासते, अशा परिस्थितीत स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणे खूप गरजेचे आहे. दररोज एका प्रौढ व्यक्तीला किमान 2 ते 3 लिटर पाणी पिण्याची गरज असते. जागतिक जल दिनानिमित्त (world water day 2022) पाणी पिण्याचे इतर आरोग्य फायदेही जाणून घेऊया. पाणी पिण्याचे आरोग्य फायदे सांधे निरोगी राहतात MedicalNewsToday मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मणक्याचे सांधे आणि डिस्कमध्ये सुमारे 80 टक्के पाणी असते. दीर्घकाळापर्यंत पाणी कमी प्यायल्यास सांध्यातील शॉक-एब्जॉर्बिंग क्षमता कमी होऊ शकते, ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास होतो. म्हणूनच दररोज पुरेसे पाणी पिणं खूप महत्त्वाचे आहे. पाणी शरीरात ऑक्सिजन वाहून नेते रक्तात 90 टक्क्यांहून अधिक पाणी असते आणि रक्त शरीराच्या वेगवेगळ्या भागात ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होऊ शकतो. त्वचा तरुण तुम्ही दररोज 2-3 लीटर पाणी पित असाल तर त्याचे फायदे त्वचा आणि केसांसाठीही होतात. त्वचा चमकदार होते. त्वचा दीर्घकाळ तरूण राहते. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास त्वचेचे अनेक विकार, लहान वयात सुरकुत्या पडणे, म्हातारपणाची लक्षणे दिसू लागतात. वजन कमी करण्यासाठी पाणी प्यायल्याने वजनही कमी होते हे तुम्हाला माहिती आहे का? होय, जर तुम्ही दररोज 8-10 ग्लास पाणी प्याल तर तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते आणि तुम्ही जास्त खाणे टाळता. जेवण करण्यापूर्वी पाणी प्यायल्यास जास्त खाणे टाळता येते. हे वाचा -  कोरफडीपासून घरीच तयार करा असा शॅम्पू; केस होतील शायनी, मिळेल नॅचरल ग्लो शरीरातून विषारी घटक शरीरात अनेक प्रकारचे विषारी-टाकाऊ घटक साचत राहतात, जे निरोगी राहण्यासाठी काढून टाकावे लागतात. शरीरातील मल आणि मूत्र काढून टाकण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. घाम येण्याच्या प्रक्रियेतही पाण्याची गरज असते. तसेच पाण्याच्या कमतरतेमुळे रक्त घट्ट होऊ शकते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. हे वाचा -  उन्हाळ्याच्या दिवसातही शरीरात राहील भरपूर ताकद; ही 5 होममेड ड्रिंक्स घ्या निरोगी किडनी किडनी हा शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. मूत्रपिंड शरीरातील द्रव नियंत्रित करते. अपुरे पाणी पिल्याने मुतखड्याचा त्रास आणि इतर समस्या उद्भवू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात