जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / संपतील नोकरीतल्या सगळ्या अडचणी; शुक्रवार करा प्रभावी उपाय

संपतील नोकरीतल्या सगळ्या अडचणी; शुक्रवार करा प्रभावी उपाय

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करून काही उपाय केल्यास नोकरीसंबंधी समस्याही दूर होतात.

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करून काही उपाय केल्यास नोकरीसंबंधी समस्याही दूर होतात.

नोकरी आणि उद्योगात अडचणींसाठी (Difficulties in job & Business) देवी लक्ष्मीची विष्णू देवांबरोबर आराधना करावी. काही सोपे उपायही करून पहा.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 8 जुलै :  कितीही प्रयत्न केले तरी हातात घेतलेल्या कामात अपयश (Failure at **work)** येत असेल. नोकरी किंवा उद्योगात अडचणी (Difficulties in job or Business) कमी होत असतील. तर माणून नेमकं काय चुकतं याचा विचार करत राहतो. पण,ज्योतिषशास्त्रानुसार (According to **Astrology)** यशासाठी प्रयत्न करुन ही बाधा येत असतील तर, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करावेत. हे उपाय शुक्रवारी (Friday) केल्याने जास्त फायदा मिळतो. शुक्रवार हा लक्ष्मीचा वार मानला जातो. या दिवशी लोक सुख,शांती आणि समृध्दीसाठी प्रार्थना करण्यासाठी उपवास करतात. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करून काही उपाय केल्यास नोकरीसंबंधी समस्याही दूर होतात. ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्याला कामात अडचणी येत असतील तर हे उपाय करून पहा. 1 शुक्रवारी देव्हाऱ्यात कमळाच्या फुलावर बसलेल्या लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. यानंतर विधिवत देवीची पूजा करावी. कमळाचं फूल,कौडी,मखाणा,बत्तासे, शंख अर्पण करावं. यामुळे नोकरीवरचं संकट टळतं. ( Vastu Tips: भाग्य बदण्यासाठी घरात वापरा वेगवेगळे रंग, कौटूंबिक आयुष्य होईल सुखी ) 2 नोकरीत सतत अडचणी येत असतील तर श्रीसुक्तचे पठण करण्याने खुप फायदा मिळतो. शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या पूजेच्या वेळी श्रीसुक्त पाठ करून शुभ परिणाम मिळता अशी मान्यता आहे. 3 नोकरीत प्रगती होण्यासाठी शुक्रवारी देवी लक्ष्मीला लाल कापड अर्पण करावं. सोबत टिकल्या किंवा कुंकू, लाल वस्त्र आणि लाल बांगड्या अर्पण कराव्यात. ( जुलै महिना आहे 7 राशींसाठी महत्त्वाचा; 4 ग्रहांच्या कृपेने बदणार आयुष्य ) 4 शुक्रवारी श्री लक्ष्मी नारायण यांच्या मंत्रांचा जाप केल्याने नोकरीशी संबंधित अडचणी दूर होत जातात. 5 नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होण्यासाठी शुक्रवारी देवी लक्ष्मीसमवेत भगवान विष्णूचीही पूजा करावी. असं केल्याने घरात आनंद,शांती आणि समृद्धी येते. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात