नवी दिल्ली, 2 जुलै: जुलै महिन्याला धार्मिक आणि शास्त्राच्या ज्योतिषशास्त्रनुसार (According to Astrology) अतिशय महत्व आहे. करण याच महिन्यामध्ये चातुर्मासाला सुरुवात होत आहे. या महिन्यांमध्ये 20 तारखेला देवशयानी एकादशी येतीय. तर, या महिन्यात 4 ग्रह आपलं स्थान परिवर्तीत करणार आहेत. या ग्रहांच्या भ्रमणाचा काही राशींवर (Zodiac Signs) शुभ परिणाम (Positive Effect) दिसणार आहे. 7 जुलैला बुध ग्रह मिथुन राशीमध्ये येणार आहेत तर, 25 जुलैला मिथुन राशीमधून निघून कर्क राशीमध्ये प्रवेश करेल. याच महिन्यांमध्ये 16 जुलैला सूर्यदेव कर्क राशीमध्ये असतील आणि 17 जुलैला शुक्र सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे. 20 जुलैला मंगळ ग्रह सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे. म्हणजेच 20 जुलैला मंगळ आणि शुक्र या 2 ग्रहांची युती सिंह राशीमध्ये होईल आणि या 4 ग्रहांमुळे 7 राशींचं नशिब बदलणार आहे. मेष रास मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. 20 जुलैला मंगल पंचम भावामध्ये असणार आहे. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या कौटुंबिक अडचणी 20 जुलैला संपणार आहेत आणि घरामध्ये आनंदी आनंद होणार आहे. याशिवाय या महिन्यात खेळाडूंना जास्त लाभ होणार आहे. 20 जुलैनंतर स्पर्धेत विजय मिळण्याची शक्यता आहे. तर, बुध ग्रहाच्या प्रभावामुळे कोटूंबिक सुख आणि समाजामध्ये मानसन्मान मिळणार आहे. मिथुन रास जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बुध ग्रह मिथुन राशीमध्ये प्रवेश करेल. यामुळे शिक्षण आणि करिअरमध्ये प्रगती होणार आहे. 16 जुलैला सूर्य ग्रह या राशीमध्ये निघून कर्क राशीमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर व्यापारामध्ये सकारात्मक बदल दिसत आहेत. हा काळ अतिशय फायदेशीर ठरणार आहे. शिवाय शुक्र ग्रहाने सिंह राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर आयुष्यात प्रेमही येमार आहे. सिंह रास सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना अतिशय फलदायी सिद्ध होणार आहे. 16 जुलैपर्यंत संपत्तीचे मार्ग खुले होणार आहेत. तर, बुध ग्रह मिथुन राशीमध्ये प्रवेश करता झाल्यानंतर टेक्निकल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना यश मिळणार आहे. व्यापारामध्ये देखील फायदा होईल मात्र, 20 जुलैनंतर थोडीशी सावधानता बाळगावी लागेल कारण 20 जुलैला शुक्र आणि मंगळ ग्रहाची युती होणार आहे. या काळात आरोग्यावरही परिणाम दिसून येतील. तुळ रास तूळ राशीसाठी हा महिना अपेक्षा पूर्ण करणारा असणार आहे. 17 जुलैला शुक्राच्या प्रभावामुळे आर्थिक फायदे मिळणार आहेत. करिअरमध्ये यश मिळणार आहे. तर, 25 जुलैला बुद्ध आणि सूर्याच्या कर्क राशीतील युतीने खूप दिवसानंतर शुभ फळ मिळणार आहे. अडकलेली काम पूर्ण होतील.शिक्षण आणि करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. वृश्चिक रास वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ 20 जुलैला दशम भाव म्हणजेच कर्म भावात येईल. त्यामुळे हा काळ शुभ मानला जातोय. मंगळाच्या कृपेमुळे नोकरीमध्ये प्रगती होईल. अडकलेली कामं मार्गी लागतील. प्रेम संबंधांमध्ये प्रगती होईल मात्र, आरोग्यावर थोडासा परिणाम दिसून येतोय. त्यामुळे तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातोय.(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.