मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

लवकर उठणं तब्येतीसाठी चांगलं की हानिकारक? जाणून घ्या डॉक्टर्स काय म्हणतात

लवकर उठणं तब्येतीसाठी चांगलं की हानिकारक? जाणून घ्या डॉक्टर्स काय म्हणतात

लवकर उठणं तब्येतीसाठी चांगलं की हानिकारक? जाणून घ्या डॉक्टर्स काय म्हणतात

लवकर उठणं तब्येतीसाठी चांगलं की हानिकारक? जाणून घ्या डॉक्टर्स काय म्हणतात

सध्या सर्वांची लाईफस्टाइल बदलली आहे. यामुळे कामाचे, खाण्यापिण्याचे आणि झोपण्याच्या वेळा देखील बदलल्या. या सगळ्याचा आपल्या शरिरावर विपरित परिणाम होत आहे. लवकर उठणं तब्येतीसाठी चांगलं की हानिकारक? आहे याविषयी डॉक्टर्स काय म्हणतात जाणून घ्या.

पुढे वाचा ...
    मुंबई, 02 जून:  रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावं (Wake Up Early) असं नेहमी सांगितलं जातं; पण सध्याची लाइफस्टाइल (Lifestyle) पाहता, सगळ्यांना ते शक्य होईलच असं नाही. शिफ्टमध्ये (Shift) काम करणाऱ्यांना सकाळी लवकर उठणं त्रासदायक ठरतं. तसंच एरव्हीही अनेक घरांमध्ये रात्री झोपण्याची वेळ किमान 11ची झाली आहे. अशा परिस्थितीत सकाळी लवकर उठणं शक्य होत नाही. अशा व्यक्तींसाठी लवकर उठणं फायदेशीर ठरतं की त्रासदायक? डॉक्टर्सच्या मते लवकर उठणं कोणासाठी चांगलं व कोणाच्या तब्येतीवर त्याचा वाईट परिणाम दिसेल, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. याबाबत माहिती देणारं वृत्त 'टीव्ही 9 हिंदी'ने दिलं आहे. सकाळी लवकर उठण्यामुळे दिवसभराच्या कामांचं योग्य नियोजन करता येतं. शरीराला लवकर उठण्याची सवय लागते व त्यामुळे व्यायामासारख्या गोष्टींनाही प्राधान्य देता येतं. सकाळी लवकर उठण्याचे असे अनेक फायदे आहेत; पण काही जणांसाठी लवकर उठणं त्रासदायक ठरू शकतं. रात्री उशिरा झोपण्याची सवय असेल, तर सवयीमुळे जबरदस्तीनं लवकर उठणं तब्येतीवर (Health) वाईट परिणाम करतं. डॉक्टरही तसा सल्ला देतात. सध्या अनेक जण शिफ्टमध्ये काम करतात. त्यांच्या कामाच्या वेळा बदलत असतात. अशा वेळी गरज नसेल, तर लवकर उठू नये, असा सल्ला मणिपाल हॉस्पिटलच्या कन्सल्टंट न्यूरॉलॉजिस्ट डॉ. पूनम चंद्रशेखर अवतरे देतात. “जोपर्यंत लवकर उठण्याची शरीराला नैसर्गिक गरज नसते, तोपर्यंत जबरदस्तीनं लवकर उठू नये,” असंही डॉक्टर अवतरे सांगतात. अशा प्रकारे उशिरा झोपूनही लवकर उठलं, तर शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होतात. एक तर लवकर उठायची इच्छा नसताना आपण बळजबरीनं लवकर उठलो, तर जेव्हा काम करायची गरज असते, त्या वेळी झोप येते किंवा उत्साह वाटत नाही. सतत असं झालं, तर त्याचा तब्येतीवर गंभीर परिणाम होतो. लवकर उठणं नैसर्गिक नसेल, तर ते चांगलं नाही, त्यापेक्षा तुमच्या कामाच्या वेळांशी योग्य दिनक्रम तयार केला, तर ते आरोग्यदायी ठरू शकतं, असंही त्यांनी सांगितलं. “मला असं वाटतं, की लवकर उठण्यानं तुमच्या कार्यक्षमतेत फार मोठी वाढ होत नाही. तसंच वेळेच्या नियोजनावरही काही मोठा परिणाम होत नाही. अर्थात तुमचं एक रूटीन (Routine) असणं गरजेचं असतं. ज्यांचं रूटीन परंपरागत कॉर्पोरेट्ससारखं असतं, त्यांचं व्यक्तिमत्त्व सकारात्मक असतं. अशा व्यक्तींच्या लवकर उठण्यामुळे कार्यक्षमतेत वाढ होते. यामुळे आपल्या आयुष्यावर आपलं नियंत्रण असल्याची भावना निर्माण होते,” असं डॉक्टर अवतरे यांचं म्हणणं आहे. सकाळी लवकर उठण्याच्या गडबडीनं झोप पूर्ण होत नाही. ही गोष्टही आरोग्यासाठी हानिकारक असते. झोप पूर्ण न झाल्यामुळे लठ्ठपणाची (Obesity) समस्या उद्भवू शकते. हृदयविकार, हाय ब्लड प्रेशर आदी विकार होऊ शकतात. एकाग्रता साधता न येणं, मूड्स बदलत राहणं, अशा समस्याही येतात. त्यामुळे जास्त ताण न घेता 6 ते 7 तासांची झोप घेऊन आपल्या कामांचं नियोजन करावं, असा सल्ला डॉक्टर देतात. सकाळी लवकर उठण्याचा अट्टहास करण्यापेक्षा कामाच्या वेळेनुसार झोप पूर्ण करणं केव्हाही फायद्याचं ठरतं. त्यामुळे उशिरा उठल्याबाबत स्वतःला दोष न देता रोजचा दिनक्रम सांभाळावा. तेच तब्येतीसाठी आरोग्यपूर्ण असेल.
    First published:

    Tags: Lifestyle, Sleep, Sleep benefits

    पुढील बातम्या