जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Lakshmi Pujan 2022 : या शुभ मुहूर्तावर करा लक्ष्मी पूजन, जाणून घ्या पूजेची योग्य पद्धत...

Lakshmi Pujan 2022 : या शुभ मुहूर्तावर करा लक्ष्मी पूजन, जाणून घ्या पूजेची योग्य पद्धत...

Lakshmi Pujan 2022 : या शुभ मुहूर्तावर करा लक्ष्मी पूजन, जाणून घ्या पूजेची योग्य पद्धत...

यावर्षी दिवाळी 24 ऑक्टोबर (सोमवार) रोजी साजरी केली जाईल. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. यादरम्यान पाच दिवस घराच्या अंगणात रांगोळी काढली जाते आणि देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 23 ऑक्टोबर : दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, दिवाळीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर धनाची देवी लक्ष्मीची पूजा केल्याने वर्षभर त्यांची कृपा प्राप्त होते. यंदाची दिवाळी 24 ऑक्टोबरला साजरी होणार आहे. दिवाळीची तयारी अनेक दिवस आधीच सुरू केली जाते. यावरूनच या सणाचे महत्त्व लक्षात येते. घरांची साफसफाई आणि रंगरंगोटी करून लक्ष्मीच्या आगमनाची प्रतीक्षा केली जाते. दिवाळीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर लक्ष्मी पूजन करणे विशेष फलदायी मानले जाते. आस्थापनांच्या पूजेसाठी वेगळा मुहूर्त आहे, तर घरांमध्ये मातेच्या पूजेसाठी वेगळा मुहूर्त सांगितला आहे. दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा पूर्ण विधीपूर्वक करावी, यामुळे जीवनात सुख-शांती तसेच समृद्धी नांदते. आम्ही तुम्हाला दिवाळीचा शुभ मुहूर्त आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत. योग्य पद्धतीचा अवलंब केल्यास तुम्ही देवीच्या कृपेला पात्र होऊ शकता.

Diwali 2022 : यंदा दिवाळीत एका दिवशी दोन सण का आले? कसे ठरतात या सणांचे दिवस?

दिवाळीत देवी लक्ष्मीची अशी करा पूजा करा दिवाळी हा सण जीवनातील नवउत्साह आणि उमेदीच्या संवादाचा सण आहे. काळोखाला छेद देणारी दिव्याच्या प्रकाशाची शक्ती आपल्याला आयुष्यात अशाच प्रकारे पुढे जाण्याची प्रेरणा देते. दिवाळीच्या रात्री लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. शुभ मुहूर्तावर देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवन सुख आणि संपत्तीने भरून जाते.

News18लोकमत
News18लोकमत

दिवाळीत लक्ष्मीची पूजा करण्यासाठी सर्व प्रथम पूजास्थानाची पूर्ण स्वच्छता करावी. संपूर्ण घराची पवित्रता राखण्यासाठी गंगाजल शिंपडावे. यासोबतच लक्ष्मीच्या आगमनासाठी घराबाहेर अगोदरच रांगोळी सजवावी. आता पूजेच्या ठिकाणी एक पाट सजवा आणि त्यावर लाल कपडा टाकून देवी लक्ष्मी आणि गणेशजींची मूर्ती किंवा फोटो ठेवा. पाटावर पाण्याने भरलेला कलश ठेवा. यानंतर देवी लक्ष्मी, गणेशजींच्या मूर्तींवर टिळक लावून दिवा लावावा. यानंतर लक्ष्मीच्या चरणी अक्षता, गूळ, हळद, अबीर-गुलाल, फळे अर्पण करा. यानंतर कुबेर, भगवान विष्णू, देवी काली आणि सरस्वती माता यांची विधिपूर्वक पूजा करा. घरात उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांनी मिळून लक्ष्मीची पूजा करावी. लक्ष्मीची पूजा केल्यानंतर घरातील तिजोरीची पूजा करावी. बुककीपिंग आणि व्यवसाय उपकरणांची पूजा करावी. पूजेनंतर सर्वांना गोड प्रसाद आणि गरजूंना दक्षिणा द्यावी. लक्ष्मी पूजा शुभ मुहूर्त द्रिक पंचांग नुसार, शुभ ब्रह्म मुहूर्त 24 ऑक्टोबर रोजी पहाटे 4:46 ते पहाटे 5:36 पर्यंत सुरू होईल तर अभिजित मुहूर्त सकाळी 11:43 ते दुपारी 12:28 पर्यंत असेल. विजया मुहूर्त दुपारी 1:58 ते दुपारी 2:43 पर्यंत आहे. Diwali 2022 Vastu Tips : दिवाळीत फॉलो करा या वास्तु टिप्स, देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन देईल धनसंपत्तीची आशीर्वाद इतर महत्त्वाचे मुहूर्त अमावस्या तिथी प्रारंभ - 24 ऑक्टोबर संध्याकाळी 5:27 अमावस्या तिथी समाप्ती - 25 ऑक्टोबर संध्याकाळी 4:18 लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त - संध्याकाळी 6:53 ते रात्री 8:16 प्रदोष काल - संध्याकाळी 5:43 ते रात्री 8:16

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात